Professor sakal
एज्युकेशन जॉब्स

Professor : एनईपीसाठी महाविद्यालयात हवे ८० टक्के प्राध्यापक

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये निदान ८० टक्के प्राध्यापकांची पदे भरलेली असावीत.

सम्राट कदम

पुणे - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये निदान ८० टक्के प्राध्यापकांची पदे भरलेली असावीत, अशी आग्रही मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केली आहे. त्यासाठी राज्याला विशेष पत्रही पाठविण्याची तयारी युजीसीने दर्शवली आहे.

अपुऱ्या तयारीमुळे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यात एनईपीची अंमलबजावणी रखडली होती. फक्त विद्यापीठे आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर हे नवे धोरण अवलंबण्यात आले होते. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकार पदवीपासूनच नवे शैक्षणिक धोरण अंमलबणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाची युजीसीचे अध्यक्ष डॉ. एम.जगदीश कुमार यांच्या सोबत झालेली बैठक महत्त्वपूर्ण ठरते. त्यात एनईपीच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांची निदान ८० टक्के पदे भरलेली असावीत, असा विषय आग्रहीपणे मांडण्यात आला आहे. चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, ऐच्छिक विषयांची संख्या, कौशल्याभिमूख अभ्यासक्रम आणि कार्यानुभवाची व्याप्ती लक्षात घेता.

महाविद्यालय स्तरावर पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही राज्यात सध्या उपलब्ध कायमस्वरूपीच्या प्राध्यापकांच्या पदांपैकी फक्त ४० टक्के पदांवर नियुक्ती आहे. उर्वरित ६० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. युजीसीने वारंवार राज्यांना प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी कडक निर्देश दिले आहे. आता निदान एनईपीच्या पार्श्वभूमीवर तरी ही पदे भरले जातील अशी अपेक्षा आहे.

सीएचबीवर प्राध्यापक देणार -

येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणत्याही परिस्थितीत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांपासून प्रशिक्षणापर्यंतचा आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. देवळाणकर सांगतात, ‘नव्या धोरणानुसार मेजर आणि मायनर विषय, अभ्यासक्रमांची रचना, प्राचार्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

विद्यापीठ स्तरावर वारंवार आढावा घेण्यात येत आहे. यंदा नवे धोरण लागू होईल. महाविद्यालयांना जर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची गरज असल्यास ते उपलब्ध करून देण्यात येतील.’’ सध्या १८ हजार प्राध्यापक तासिका तत्त्वावर कार्यरत असून, ही संख्या २८ हजारापर्यंत वाढविण्याची तयारी उच्च शिक्षण विभागाने दर्शवली आहे.

विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन हित लक्षात घेता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून कोणत्याही परिस्थितीत नवे धोरण अवलंबिले जाणार आहे. विभागाच्या स्तरावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जर महाविद्यालय स्तरावर एकंदरीत कार्यभार विचारात घेता प्राध्यापकांची कमतरता असेल, तर तासिका तत्त्वावरील अधिकच्या प्राध्यापक पदांना मान्यता देण्यात येईल.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT