Competitive Exam  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Competitive Exam : मेहनत करणाऱ्यांच्या मागे देव उभा राहतोच; युवकाला आल्या पाच सरकारी ऑफर्स

काही ना काही कारणाने यशाच्या जवळ जाऊनही अनेकदा सुरेंदर यांच्या पदरी अपयश येत होते.

सकाळ डिजिटल टीम

Competitive Exam Student Get Five Government Offers : मेहनत करणाऱ्यांना देवही निराश करत नाही असे आपण म्हणतो. असाच काहीसा प्रत्यय एका युवकाला आला आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हरियाणातील एका तरूणाची ही कहाणी वरील उक्तीला अगदी तंतोतंत लागू होणारी आहे. पदवीनंतर सुरेंदर गोदास यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरेंदर सर्व सरकारी पदांसाठीच्या लेखी परीक्षा देत असत.

मात्र, अंतिम गुणवत्ता यादीत काही केल्या देवास यांचे नाव येत नव्हते. वेळोवेळी मिळणाऱ्या अपयशानंतरही गोदास यांनी हार मानली नाही आणि अखेर सुरेंदर यांना एक दोन नव्हे तर तब्बल पाच सरकारी नोकऱ्यांसाठीचे कॉल लेटर मिळाले.

हरियाणातील सिरसा येथील सरकारी नॅशनल कॉलेजमधून 2018 मध्ये B.Sc (B.Sc) केलेल्या सुरेंदर गोदारा या तरुणाची ही कथा आहे. पदवीनंतर सुरेंदर यांनी सरकारी नोकरीची तयारी करण्यास सुरूवात केली.

पहिल्यांदा सुरेंदर यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये CDS साठीची लेखी परीक्षा दिली. यात यश मिळाले. मात्र, काही ना काही कारणाने यशाच्या जवळ जाऊनही अनेकदा सुरेंदर यांच्या पदरी अपयश येत होते.

पहिली सरकारी नोकरी

वेळोवेळी मिळणाऱ्या अपयशात SSC MTS 2019 चा अंतिम निकाल 6 मार्च 2021 रोजी जाहीर झाला. यात गोदारा यांनी निवड झाली. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात (DGCA) गोदारा रुजू झाले.

दरम्यान, DGCA जॉईन होऊन काही दिवसच झाले होते. त्यातच SBI JA 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यातही गोदारा यांचे नाव गुणवत्ता यादीत आले होते. त्यामुळे गोदारा यांनी DGCA ची नोकरी सोडली आणि ते 21 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमधील SBI मध्ये रुजू झाले.

एके दिवशी दुपारी बँकेत जेवण करत असताना SSC CGL-2019 चा अंतिम निकाल लागल्याचे त्यांच्या मित्राने गोदारा यांना फोनवर सांगितले. त्यानंतर उत्सुकतेपोटी गोदारा यांनी निकाल तपासला असता गुणवत्ता यादीत नाव होते. यावेळी त्यांची भारत सरकारच्या आयकर विभागात त्यांची निवड झाली होती. त्यामुळे DGCA नंतर SBI मध्ये रूजू होणाऱ्या गोदारा यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीतील आयकर विभागात रुजू होण्याचा निर्णय घेतला.

दोन नोकऱ्या सोडून तिसऱ्या सरकारी नोकरीत रूजू होणाऱ्या गोदारा यांचे नशीब यानंतरही खणखणत होते. आयकर विभागात नोकरी करत असताना SSC CHSL-2019 परीक्षेतही गोदारा यांची निवड झाली होती. तसेच 2020 मध्ये सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षकपदी निवड झाली होती.

मात्र, गोदारा यांनी चौथी आणि पाचवी सरकारी नोकरीची ऑफर नाकारत आयकर विभागातच नोकरी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परीक्षा देऊनही पदोपदी सुरेंदर यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यामुळे उशीरा का होईना अखेर सुरेंदर यांना एकदा नव्हे तर पाचवेळा यश मिळाले.

आयुष्यात आलेला हा अनुभव सुरेंदर यांनी Quora वेबसाइटवर शेअर केली असून, अनेकांसाठी हा अनुभव प्रेरणादायी ठरत आहे. पोस्टच्या शेवटी गोदारा यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ''आशा कधीही सोडू नका... कठोर परिश्रम करा आणि आपले ध्येय साध्य करा'' असा मोलाचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT