school fees sakal media
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?

विद्यार्थी, पालक संघटनांनी उपस्थित केला सवाल

संजीव भागवत

मुंबई : कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे (corona situation) फेब्रुवारी-मार्च-२०२१ मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा (ssc-hsc exam) हेाऊ शकल्या नाहीत. त्या जीआर काढून रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र या परीक्षांसाठी शिक्षण मंडळाकडून (education authorities) घेण्यात आलेले शुल्क मंडळाकडून अद्याप परत देण्यात आलेले नसल्याने हे शुल्क कधी देणार (Fees issue) असा सवाल राज्यातील विद्यार्थी, पालक संघटनांनी (parents students union) उपस्थित केला आहे.

दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी प्रती विद्यार्थ्यांकडून सुमोर ४५० च्या दरम्यान शुल्क आकारण्यात आले होते. ही राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची मिळून ही रक्कम १५० कोटींच्या आसपास आहे. मात्र या शुल्काच्या रकमेचे आणि त्यासाठी मिळालेल्या व्याजाच्या रकमेचे नेमके काय झाले, याचे कोणतेही स्पष्टीकरण आत्तापर्यंत राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले नसल्याने याविषयी विविध संघटनांनी आक्षेप नोंदवत हे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून सीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्य सरकारने अकरावी प्रवेश परीक्षेसाठी या शुल्कांचा वापर करणार असल्याचे न्यायालयात सांगितले होते. मात्र न्यायालयाने परीक्षाच रद्द केल्याने दहावी-बारावीच्या शुल्काचे पुढे काय झाले याची माहिती मंडळाकडून का देण्यात आली नाही असा सवाल बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.

कोरोना काळात असंख्य पालक संकटात सापडले होते, तरीही त्यांनी परीक्षा शुल्क भरलेले होते. मात्र नंतर परीक्षाच झाली नसल्याने हे शुल्क तात्काळ परत करण्याची जबाबदारी ही शिक्षण मंडळाने घेणे अपेक्षित हेाते, मात्र आता तरी दहावीच्या सुमारे १७ आणि बारावीच्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांचे जवळपास ५०० कोटींच्या दरम्यान जमा झालेले शुल्क तातडीने परत द्यावे अशी मागणी मागासवर्गीय विद्यार्थी-पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी केली आहे.

"परीक्षा झाली नसल्याने ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले आहे, त्यांना ते परत देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी बँकांशी टाईप करून हे शुल्क विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे."

- डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

Rohini Kalam: धक्कादायक! फोनवर बोलली, नंतर खोलीत गेली अन्...; भारतीय महिला खेळाडूनं संपवलं जीवन

Delhi Acid Attack : राजधानी दिल्लीत संतापजनक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ‘अ‍ॅसिड’ हल्ला

Uttar Pradesh News : सीएम योगींची दिल्लीत पीएम मोदींशी भेट, सुमारे एक तास चर्चा; मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन?

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

SCROLL FOR NEXT