exam ctet Sakal
एज्युकेशन जॉब्स

CTET Exam : ‘सीटीईटी’ परीक्षा ७ जुलैला होणार; परीक्षेसाठी २ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ‘सीटीईटी’ यंदा ७ जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ‘सीटीईटी’ यंदा ७ जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

उमेदवारांना २ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.‘सीबीएसई’ने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

केंद्रीय स्तरावर सीबीएसईकडून सीटीईटी आयोजित केली जाते. त्यानुसार ७ जुलैला होणारी सीटीईटी ही १९ वी परीक्षा आहे. देशभरातील १३६ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.  उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी २० भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत.

पेपर एक सकाळी साडे नऊ ते बारा, तर पेपर दोन दुपारी साडेचार या वेळेत होणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची नावे, महत्त्वाच्या तारखा याचा संपूर्ण तपशील सीटीईटीच्या ‘https://ctet.nic.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit : साठवणूक मर्यादेत वाढ सणांच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी १२ विशेष लोकल! पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

पनवेल-कर्जत प्रवास सुसाट! १०.८६ किमी मार्गाचा विस्तार होणार, रोज पाच गाड्या अतिरिक्त धावणार

Ganpati Visarjan violence : गणपती विसर्जनावेळी राडा; पोलिसांनी डीजे जप्त केला अन् खासदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या

SCROLL FOR NEXT