CUET-PG Admit Card SAkal
एज्युकेशन जॉब्स

CUET-PG Admit Card : ‘सीयुईटी-पीजी’ परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणारी ‘सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-२०२४’ (सीयुईटी-पीजी) येत्या रविवारी (ता. १७) होत आहे. या परीक्षेसाठी प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

CUET-PG Admit Card: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणारी ‘सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-२०२४’ (सीयुईटी-पीजी) येत्या रविवारी (ता. १७) होत आहे. या परीक्षेसाठी प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

देशातील केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे, नामांकित शैक्षणिक संस्था, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यामधील विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी ‘सीयुईटी-पीजी २०२४’ ही परीक्षा घेण्यात येत आहे.

देशातील विद्यार्थ्यांना आणि विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक समान व्यासपीठ आणि समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा ‘एनटीए’मार्फत घेतली जाते.

‘सीयुईटी-पीजी’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र ‘https://pgcuet.samarth.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहेत. संबंधित संकेतस्थळावर अर्ज क्रमांक आणि जन्म दिवस अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेता येणार आहेत.

विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे, त्यानंतर प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षेसाठी परीक्षार्थीकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थींनी प्रवेश पत्र सांभाळून ठेवणेही आवश्यक आहे, अशा सूचना ‘एनटीए’ने दिल्या आहेत.

याशिवाय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘www.nta.ac.in’ आणि ‘https://pgcuet.samarth.ac.in’ ही अधिकृत संकेतस्थळे सातत्याने पाहावीत. परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती या संकेतस्थळाद्वारे परीक्षार्थींना देण्यात येत आहे. तसेच, प्रवेश पत्र डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास किंवा प्रवेश पत्रातील माहितीत विसंगती आढळल्यास संबंधित परीक्षार्थींनी ‘cuet-pg@nta.ac.in’ या ईमेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहनही ‘एनटीए’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT