Pharmacy esakal
एज्युकेशन जॉब्स

D Pharmacy : डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घेण्याची मागणी

औषधनिर्माणशास्त्रातील पदविकेच्या (डी.फार्मसी) पहिल्या वर्षाचा निकाल यंदा चिंताजनक लागला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - औषधनिर्माणशास्त्रातील पदविकेच्या (डी.फार्मसी) पहिल्या वर्षाचा निकाल यंदा चिंताजनक लागला आहे. प्रत्येक महाविद्यालयातील २५ ते ३० टक्के विद्यार्थी नापास झाले असून, पालकांसह महाविद्यालयांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम केवळ ९० दिवसांत पूर्ण करण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे तज्ज्ञ बोलतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रथम वर्षाचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. त्याचाच फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. व्ही.एन. जगताप सांगतात, ‘प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये प्रथम वर्षाच्या शिकवणीला सुरवात झाली.

फार्मसीला वार्षिक परीक्षा असल्याने १८० दिवसांचा अभ्यासक्रम ९० दिवसांत संपवावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी सुटीच्या दिवशीही शिकवण्यात आले. कमी वेळेत तेवढ्याच अभ्यासक्रमावर परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण चिंताजनक असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांची पुर्नपरीक्षा घेण्याची मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण मंडळासह फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियालाही अर्ज केला आहे.’

तज्ज्ञ म्हणतात..

- पदविका वर्षभर असताना केवळ ९० दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वेळ

- एवढ्या कमी वेळेत विद्यार्थ्यांना अवाजवी अभ्यासक्रम

- अतिरिक्त तास आणि वेळेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही

- फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकांची पायमल्ली

- शैक्षणिक नुकसानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड

मागणी...

विद्यार्थ्यांची तातडीने पुर्नपरीक्षा घेत दिलासा द्यावा. किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड नियम लावत पुढच्या वर्गात जाण्याची परवानगी मिळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

SCROLL FOR NEXT