Hotel Management Sakal
एज्युकेशन जॉब्स

वेगळ्या वाटा : हॉटेल मॅनेजमेंट व पर्यटनातून प्रगती

हॉटेल व पर्यटन व्यवसायात सुस्थापित हॉटेल हे एक क्षेत्र सुस्थापित व प्रतिष्ठित रोजगार संधीचे क्षेत्र ठरले आहे.

दत्तात्रेय आंबुलकर

हॉटेल व पर्यटन व्यवसायात सुस्थापित हॉटेल हे एक क्षेत्र सुस्थापित व प्रतिष्ठित रोजगार संधीचे क्षेत्र ठरले आहे.

सध्याच्या पर्यटन प्रधान स्थितीत लोकांचे प्रवास करणे व पर्यटन आणि व्यापार-उदिमांसाठी विविध ठिकाणी जाणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. जनसामान्यांच्या या पर्यटन प्रवासाच्या गरजेतून पर्यटन उद्योग केवळ साकारला प्रस्थापित झाला एवढेच नव्हे तर सतत विकसित झाल्याने त्याद्वारे पर्यटन व संबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असतात.

हॉटेल व पर्यटन व्यवसायात सुस्थापित हॉटेल हे एक क्षेत्र सुस्थापित व प्रतिष्ठित रोजगार संधीचे क्षेत्र ठरले आहे. हॉटेल क्षेत्राशी निगडित विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर १९८२मध्ये नॅशनल कांऊसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲँड केटरिंग टेक्नॉलॉजीची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली. संस्थेतर्फे व संस्थेद्वारे मान्यताप्राप्त संस्थामध्ये हॉटेल व पर्यटन व्यवस्थापन क्षेत्रात विविध अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

पर्यटन व हॉटेल व्यवसायाशी संबंधित विशेष अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवार कमीतकमी बारावीची पात्रता उत्तीर्ण केलेले असावेत. सध्या नॅशनल काऊंसिल अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम व त्यानंतर २ वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम यांचा प्रामुख्याने समावेश असतो. हे दोन्ही अभ्यासक्रम विकसित स्वरूपात व नव्याने सुरुवात करण्यात आल्याने या क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांची संख्या मर्यादित असल्याने नव्यांना नेहमीच वाव असतो.

‘नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲँड केटरिंगतर्फे’ संस्थेच्या विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण व पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविले जातात. यानुसार अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावर लेखी प्रवेश परीक्षा देशभरातील निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व पुणे या परिक्षा केंद्रांचा सर्वसाधारणपणे समावेश असतो. लेखी निवड परिक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांना विविध संस्थांमधील संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने अन्न पदार्थ प्रक्रिया व निर्मिती, खाद्यांनाची रचना व ग्राहकसेवा, दैनंदिन कामकाज, हॉटेलमधील ग्राहकांचा निवास व त्या संदर्भातील आवश्यक बाबी, ग्राहक सेवा, बिलिंग-हिशोब, भाषांचे ज्ञान व शैली, संवादक्षमता, वेशभूषा इ.चे तपशिलवार ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याचे सराव प्रशिक्षण दिले जाते. बारावीनंतर सेवा व हॉटेल-पर्यटन उद्योग क्षेत्रात करिअर करायचे असेल त्यांनी या अभ्यासक्रमांचा विचार करावा. नोकरीच्या विविध संधी व आकर्षक फायदे यांचा लाभ त्यांना हॉटेल क्षेत्राबरोबरच पर्यटन संख्या व त्याशिवाय हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो.

वरील अभ्यासक्रमांसाठी संपर्कासाठी महाराष्ट्रातील काही निवडक संस्था पुढीलप्रमाणे.

  • मेट्रोपॉलिटन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, प्लॉट नं. २०, दुसरा माळा, वल्लभभाई मार्ग, मुंबई ४०००२८.

  • नॅशनल कांऊसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (दादर केटरिंग कॉलेज) वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.

  • सोफिया पॉलिटेक्निक, मुलाभाई देसाई मार्ग, मुंबई ४०००२६.

  • रिझवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, रिझवी एज्युकेशन कॉम्प्लेक्स, वांद्रे (प), मुंबई ४०००५०.

  • नेव्हल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, पश्चिम कमांड, ४ - पास्ता लेन, कुलाबा, मुंबई ४०० ००५.

  • डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, विवेकानंद नगर, सेक्टर-८, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४.

  • नुली इन्स्टिट्यूट ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी तुली इंटरनॅशनल, सदर, नागपूर ४४०००१.

  • इन्स्टिट्यूट ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी, शिवाजीनगर, पुणे - ४११००५.

  • कोहिनूर इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ५१ हिल-टॉप, ड्युक्स रिट्रिटसमोर, खंडाळा-लोणावळा, जि. पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT