RTE Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २७ मेपर्यंत प्रवेशासाठी मुदत

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे.

पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २७ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दरवर्षी खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ऑनलाइन सोडत (लॉटरी) ३० मार्च रोजी काढण्यात आली. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मे पर्यत मुदत दिली होती. आता पुणे जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यांतील निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सुरवात गुरूवारी झाली.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना गुरूवारपासून एसएमएस जाण्यास सुरवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. आणि हे ॲलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मुदतीत जवळच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २७ मे पर्यत कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

प्रतीक्षा यादीत राज्यातील १७ हजार ६३९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना सूचना -

- प्रवेश घेण्याची मुदत : २७ मे २०२२ पर्यंत

- पुणे वगळता संपूर्ण राज्यात प्रक्रिया सुरू

- अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईलवर ‘एसएमएस’ येईल

- केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवर अर्जाची स्थिती पहावी

- लॉटरी लागलेल्या पालकांनी ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी

- ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि कागदपत्रे घेऊन पडताळणी केंद्रावर प्रवेश निश्चित करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT