admission esakal
एज्युकेशन जॉब्स

डिप्‍लोमा प्रवेशप्रक्रियेला गती; प्रतीक्षा संपली!

अरूण मलाणी

नाशिक : इयत्ता दहावीनंतर तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍नीक)मध्ये पदविका (डिप्‍लोमा) शिक्षणक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. सोमवारी (ता. १३) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. पहिल्‍या कॅपराउंडसाठी ऑप्‍शनफॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुवार (ता. १६)पर्यंत मुदत दिली आहे. त्‍यामुळे प्रवेश निश्‍चितीची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

डिप्‍लोमाच्‍या ऑप्‍शनफॉर्मसाठी आजपर्यंत मुदत

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ९ सप्‍टेंबरला प्रारुप गुणवत्ता यादी जाहीर झाली. सोमवारपासून गुरुवारपर्यंत पहिल्‍या कॅपराउंडसाठी ऑनलाइन ऑप्‍शनफॉर्म भरण्याची मुदत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतन, शाखा निवडीचे पर्याय नोंदवायचे आहेत. नंतर शनिवारी (ता. १८) पहिल्‍या कॅप राउंडसाठी तात्‍पुरती वाटप यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्‍यांना उपलब्‍ध झालेली जागा लॉगइन आयडीद्वारे स्‍वीकारण्याची मुदत रविवार (ता. १९)पासून २२ सप्‍टेंबरपर्यंत असेल. संबंधित तंत्रनिकेतनमध्ये जाऊन प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २३ सप्‍टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. लगेचच दुसऱ्या कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल. यात विद्यार्थ्यांना २४ ला उपलब्‍ध जागांचा तपशील उपलब्‍ध केला जाईल. नंतर तंत्रनिकेतन, शाखांच्‍या पर्यायाची नोंदणी, यापूर्वी नोंदविलेल्‍या पर्यायांमध्ये दुरुस्‍तीसाठी २५ ते २८ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल. ३० सप्‍टेंबरला दुसऱ्या कॅप राउंडची वाटप यादी जाहीर होईल. १ ते ५ सप्‍टेंबरदरम्‍यान विद्यार्थ्यांनी त्‍यांच्‍या लॉगइनवरून जागेचा स्‍वीकार करत पुढील प्रक्रिया राबवायची आहे. संबंधित तंत्रनिकेतनमध्ये जाऊन शुल्‍क भरत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल. १ ऑक्‍टोबरपासून शैक्षणिक वर्गांना सुरवात होणार असून, १३ ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

डी.फार्म.ची अंतिम गुणवत्ता यादी रविवारी

इयत्ता बारावीनंतरच्‍या पदविका शिक्षणक्रमांची प्रक्रियाही सुरू आहे. या अंतर्गत डी.फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी, सरफेस ॲन्ड कोटींग टेक्‍नॉलॉजी या शिक्षणक्रमांत प्रवेशाची संधी आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केलेल्‍या तात्‍पुरती गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविण्यासाठी गुरुवार ते शनिवारपर्यंत मुदत असेल. रविवारी (ता. १९) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. २० सप्‍टेंबरला जागांचा तपशील जाहीर केल्‍यानंतर, पहिल्‍या कॅप राउंडच्‍या ऑप्‍शन फॉर्म भरण्यासाठी २० ते २२ सप्‍टेंबरदरम्‍यान मुदत असेल. २४ ला पहिली वाटप यादी प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्याना जागा स्‍वीकारण्यासाठी २५ ते २७ पर्यंत मुदत असेल. तर संबंधित महाविद्यालयात २८ पर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT