Deadline for YCMOU's MBA-CET application esakal
एज्युकेशन जॉब्स

YCMOUच्‍या MBA-CETच्‍या अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदत

अरूण मलाणी

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत (YCMOU) येणाऱ्या एमबीए (MBA) शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशप्रक्रियेला गती आली आहे. एमबीए प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे घेतल्‍या जाणाऱ्या एमबीए-सीईटी (MBA-CET) परीक्षेच्‍या नोंदणीप्रक्रियेस सुरवात झाली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना १४ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन स्‍वरूपात ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

...अशा प्रकारे करा नोंदणी

यासंदर्भात विद्यापीठाने सविस्‍तर दिशानिर्देश जारी केले आहेत. त्‍यानुसार एमबीए शिक्षणक्रमासाठीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पाचशे रुपये शुल्‍क असून, ते ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. परीक्षेसाठी नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना सराव चाचणी (Demo-mock test) आणि मुख्य प्रवेश परीक्षा देता येईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्‍या उमेदवारांनी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाइन लिंकचा वापर करत स्‍वतंत्ररीत्‍या प्रवेश अर्ज भरायचा आहे. प्रवेश अर्ज भरताना शिक्षणक्रम, अभ्यास केंद्र आणि विषयांची निवड करून प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. सीईटी परीक्षेच्‍या तारखेची घोषणा अद्याप केलेली नसून, उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.

बी. एड.साठी ३१ पर्यंत मुदतवाढ

बी. एड. विशेष शिक्षण या शिक्षणक्रमाच्‍या ऑनलाइन प्रवेशाची मुदत वाढविण्याचा निर्णय मुक्‍त विद्यापीठाने घेतला आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्‍टपर्यंत विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळाला भेट देत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT