Deccan College sakal
एज्युकेशन जॉब्स

Deccan College : डेक्कन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवली संस्कृत इंटर्नशिप कार्यशाळा

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे संस्कृत विषयातील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यशाळा आयोजित केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे संस्कृत विषयातील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत देशातील २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात मोठ्या संस्कृत भाषेतील शब्दकोशात प्राथमिक स्तरावर काम करण्याचा अनुभव घेतला.

डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी (एम.ए) आणि पीएच.डी हे अभ्यासक्रम राबविले जातात. तसेच संस्कृतमधील पदविका प्रमाणपत्राचा अभ्यासक्रमही घेतला जातो. या विभागात ‘ॲन एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टोरिकल प्रिन्सिपल्स’ हा जागतिक कीर्तीचा प्रकल्पही कार्यान्वित आहे.

संस्कृत भाषेतील शब्दाची प्रचंड सामग्री उपलब्ध असल्यामुळे हा शब्दकोश पूर्ण झाल्यावर तो जगातील सर्वात मोठा शब्दकोश असणार आहे. या संस्कृत कोश प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सहा हजारांहून अधिक पानांच्या शब्दकोशाचे ३५ खंड प्रकाशित झाले आहेत. हा प्रकल्प राज्य सरकारच्या आणि नवी दिल्लीतील केंद्रीय संस्कृत विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या निधीतून सुरू आहे.

संस्कृत आणि कोशशास्त्रातील शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील व्यावहारिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने इंटर्नशिप कार्यशाळा आयोजित केली होती. त्यानुसार यावर्षी बी.ए तृतीय वर्ष आणि एम.एच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपचे आयोजन करण्यात आली. इंटर्नशिपचा कालावधी एक ते एकवीस जून असा होता.

पुण्यातील विविध संस्थांमधून तसेच कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, नाशिक, नवी दिल्ली, तिरूपती, बंगलोर शहरांमधून ५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला होता. मर्यादित जागांमुळे त्यातील २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय शिक्षण प्रणालीनुसार इंटर्नशिपसाठी दोन श्रेयांक देण्यात आले. इंटर्नशिपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शब्दकोश बनविण्याच्या सर्व प्राथमिक पायऱ्यांवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गावरून सांगलीत पुन्हा ठिणगी? वाळव्‍यात 1276 शेतकऱ्यांकडून हरकती, भूसंपादन प्रक्रियेविरोधात मांडली भूमिका

SCROLL FOR NEXT