Maha CET Cell esakal
एज्युकेशन जॉब्स

Cet Cell : सीईटी सेलच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत वाढविण्याची मागणी

राज्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विधी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सीईटी सेलने पूर्ण केली आहे.

मीनाक्षी गुरव

पुणे - बारावीची पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होणार आहे. परंतु दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमातील पुढील शिक्षणाची संधी मिळावी, म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी आग्रही मागणी विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी केली आहे.

राज्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विधी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सीईटी सेलने पूर्ण केली आहे. राज्यातील जवळपास सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनीही पुरवणी परीक्षा दिली आहे. परंतु सीईटीत पात्र असतानाही बारावीच्या पुरवणी परीक्षेतील निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे.

यासंदर्भात ‘सकाळ’ने आवाज उठविला आहे. पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सकाळ’ने हा विषय लावून धरला आहे. दरम्यान, प्रशासनाला अद्याप जाग आली नसली तरी आता राजकीय आणि सामाजिक संघटना मात्र या विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्यासाठी पुढे येत आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. तसेच ‘सीईटी सेल’नेही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘कॅप’ फेरीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

यावेळी पुणे शहर अध्यक्ष विक्रम जाधव, कार्याध्यक्ष अजय पवार, युवक उपाध्यक्ष रोहन पायगुडे आदी उपस्थित होते.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीचे निवेदन विविध संघटनांनी एकत्रितरीत्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांना दिले आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी  महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, पुणे शहर काँग्रेसचे संघटक सचिव अभिजित महामुनी, भारतीय जनता पक्ष कला व सांस्कृतिक आघाडीचे सरचिटणीस शैलेश बडदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित पावले उचलण्यात आली नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या विविध संघटनांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT