JEE Main Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main Exam : जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

पालक संघटनेकडून थेट पंतप्रधानांकडे साकडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशभरातील एनआयटी, ट्रिपल आयटी यांसह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमातील (बी.ई. आणि बी.टेक) प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा आणि अनेक राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेची प्रात्यक्षिक आणि प्रिलियम परीक्षा एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या जानेवारी सत्रातील जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२३ दरम्यान पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रासंदर्भात माहिती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एनटीएमार्फत जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सोशल मिडियावर विविध विद्यार्थी-पालक संघटनांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरल्याचे दिसून येते. ट्विटर आणि फेसबुक अशा विविध माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. याची दखल घेऊन इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. ‘बारावीच्या परीक्षेनंतर ही परीक्षा घेण्यात यावी’, अशी मागणी या पत्राद्वारे पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रिलियम यांच्यासह, आयसीएसई, बिहार राज्य, आसाम राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा आणि जानेवारीत होणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा कालावधी एकाच वेळेस येत आहेत. त्यामुळे या मंडळांच्या लाखो विद्यार्थ्यांना जानेवारीत होणाऱ्या जेईई मेन परीक्षेपासून लांब राहावे लागण्याची शक्यता आहे किंवा अति ताणात या दोन्ही परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सोशल मिडियाद्वारे होत आहे.

"देशातील विविध मंडळांमध्ये आणि अनेक राज्य मंडळांमधील बारावीच्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा, प्रिलियम आणि जेईई मेन परीक्षा जानेवारीत होत आहेत. तसेच फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच काही राज्यांमधील बारावीच्या परीक्षा सुरू होतात. परिणामी हजारो विद्यार्थ्यांना जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा देणे शक्य होणार नसल्याचे निदर्शनास येते. किंबहुना विद्यार्थ्यांचा ताणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून यावर काय प्रतिसाद येतो, याच्या प्रतीक्षेत आहोत. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कायदेशीर दाद मागण्यासाठी पावले उचलली जातील.’’

- अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT