design education festival on saturday and sunday 13th 14th january career option student  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune News : ‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय? मग या फेस्टिव्हलची अनोखी संधी चुकवू नकाच !

डिझाइनचं काम कोण करतं, हे डिझाइन कसं करायचं, हे कुठं शिकवलं जातं का?, डिझाइनचा उपयोग आणि महत्त्व काय?

सकाळ वृत्तसेवा

Pune News : डिझाइनचं काम कोण करतं, हे डिझाइन कसं करायचं, हे कुठं शिकवलं जातं का?, डिझाइनचा उपयोग आणि महत्त्व काय? डिझाइन क्षेत्रात करिअर कसे करता येईल? त्यासाठी अभ्यासक्रम कोणते आहेत?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘डिझाइन एज्युकेशन फेस्टिव्हल’मध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मिळणार आहेत. हा फेस्टिव्हल येत्या शनिवारी - रविवारी (ता. १३ आणि १४) बाणेरमधील ‘यशवंतराव चव्हाण अॅकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन’ (यशदा) येथे होणार आहे. सकाळी १० ते रात्री १० दरम्यान तो सर्वांसाठी खुला आहे.

‘असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया’ची पुणे शाखा आणि सकाळ माध्यम समूह यांनी हा फेस्टिव्हल आयोजित केला आहे. यात अनेक मान्यवर, तज्ज्ञ शिक्षकांच्या कार्यशाळा, मार्गदर्शक सत्रे होतील. नामवंत डिझाइन शिक्षण संस्थांचा यात सहभाग असेल.

फेस्टिव्हलमध्ये ‘फ्ली-मार्केट’ही असेल. डिझाइन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हा फेस्टिव्हल म्हणजे उत्तम संधी आहे. त्यात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून डिझाइन क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम व शैक्षणिक संस्थांमधून दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली जाणार आहे.

याबरोबरच प्रॉडक्ट डिझाइन, ग्राफिक डिझाइन, ॲनिमेशन, यूएक्स डिझाइन, फॅशन डिझाइन, सर्व्हिस डिझाइन या डिझाइनच्या विविध शाखांमधील व्यावसायिक तज्ज्ञांकडून त्यांचे अनुभव ऐकण्याची संधीही उपस्थितांना मिळणार आहे. या क्षेत्रातील विपुल संधींबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश दांडेकर म्हणाले, ‘‘एखादी छान वस्तू जी आपले जीवन सुखकर करते, ती खूप उपयोगी असते आणि आपल्याला आवडते, आपण सहज म्हणून जातो की ‘किती छान डिझाइन केले आहे.’

ही उत्कट प्रतिक्रिया फक्त त्या वस्तूच्या दिसण्यावरून नसते, पण आपल्याला आलेल्या अनुभवाचे सहज केलेले वर्णन असते. डिझायनर होण्यासाठी काही कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. त्याची माहिती विद्यार्थ्यांना या फेस्टिव्हलमधून मिळेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT