student  sakal
एज्युकेशन जॉब्स

Highest Salary Package: यूट्यूब वरुन केली मुलाखतीची तयारी..अन् कंपनीनं दिलेल्या ऑफरनं IIM चा विक्रम मोडला...

कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी रिती नेमा हिला 57 लाखांचे पॅकेज मिळाले.

Aishwarya Musale

देशभरातील विविध विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना असे वाटते की, मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानेच करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात, परंतु हे पूर्णपणे खरे नाही. कारण गेल्या काही वर्षांत देशातील विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांनी भरघोस पगाराच्या पॅकेजवर नोकरी दिली आहे.

इंदूरमधील देवी अहिल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याने प्लेसमेंटच्या बाबतीत विद्यापीठाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई केलेल्या रिती नेमाला एका परदेशी कंपनीकडून सुंदर पगाराचे पॅकेज ऑफर करण्यात आले होते.

आश्चर्याची बाब म्हणजे या विद्यार्थ्याचे पॅकेज आयआयएम इंदूरच्या सर्वोच्च पॅकेजपेक्षा जास्त होते. 2021-22 च्या प्लेसमेंटमध्ये, तिला ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टवेअर कंपनी अॅटलासियनने 57 लाख रुपयांच्या भरघोस पगारावर हायर केले होते. आयआयएम इंदूरच्या ४९ लाख रुपयांच्या पॅकेजपेक्षा हे सुमारे ८ लाख रुपये अधिक होते.

मुलाखतीची जोरदार तयारी

भरघोस पगाराचे पॅकेज मिळविण्यासाठी, रितीने प्लेसमेंट प्रक्रियेची माहिती मिळताच तयारी सुरू केली. रिती त्यावेळी सेमिस्टर 4 मध्ये होती. मुलाखतीची तयारी करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. प्रत्येक संभाव्य प्रश्नाची तयारी केल्यानंतर, रितीने तिच्या मित्रांना मॉक इंटरव्ह्यू देऊन पॅनेलला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढवला.

मुलाखतीत सिलेक्शनसाठी, रितीला 3 राउंड क्लिअर करावे लागले, त्या सर्व ऑनलाइन होत्या. पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांच्या कोडिंग कौशल्याची चाचणी घेण्यात आली, दुसरी सिस्टीम डिझाइनबद्दल आणि तिसरी फेरी मॅनेजमेंट व्हॅल्यूवर आधारित होती. 2021-22 प्लेसमेंट सिजनमध्ये 700 हून अधिक कंपन्यांकडून ऑफर मिळालेल्या 405 DAVV विद्यार्थ्यांपैकी, रितीने रिकॉर्ड-ब्रेकिंग पॅकेजसह शीर्षस्थानी येण्यासाठी सर्व राउंड क्लिअर केले.

गेल्या वर्षी डीएव्हीव्हीमध्ये विद्यार्थ्यांची विक्रमी प्लेसमेंट

भोपाळचे रहिवासी असलेल्या रिती नेमाचे वडील हेल्थकेअर क्षेत्रात काम करतात. रिती ही हुशार विद्यार्थिनी होती आणि सुरुवातीपासूनच तिचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. रितीने मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि शालेय स्तरावर रुबिक्स क्यूब स्पर्धाही जिंकली. रितीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती सध्या अॅटलासियनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT