एअरोस्पेस क्षेत्रात सोलापूरच्या धनंजयची भरारी! Canva
एज्युकेशन जॉब्स

एअरोस्पेस क्षेत्रात धनंजयची भरारी! युरोपियन कंपनीसोबत सामंजस्य करार

एअरोस्पेस क्षेत्रात सोलापूरच्या धनंजयची भरारी! युरोपियन कंपनीसोबत सामंजस्य करार

प्रकाश सनपूरकर

स्वतःची कंपनी स्थापन करून धनंजयने युरोपीयन स्पेस कंपनीशी करार करून सोलापूरची मान अभिमानाने उंचावली आहे.

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) सेंट जोसेफ स्कूलचा माजी विद्यार्थी धनंजय बरबडे (Dhananjay Barbade) याने युरोपच्या (Europe) एअरोस्पेस (Aerospace) क्षेत्रात संशोधनाच्या (Research) माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. स्वतःची कंपनी स्थापन करून धनंजयने युरोपीयन स्पेस कंपनीशी करार करून सोलापूरची मान अभिमानाने उंचावली आहे. धनंजय हा सेवानिवृत्त कृषी उपसंचालक विजयकुमार बरबडे यांचा मुलगा आहे.

धनंजयचे शालेय शिक्षण सोलापुरातील सेंट जोसेफ स्कूलमध्ये झाले. त्यानंतर काही वर्षे त्याने कोल्हापुरात शिक्षण घेतले. नंतर सोलापुरातील ऑर्किड इंजिनिअरिंग महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात युरोपियन स्कॉलरशिपची परीक्षा धनंजयने दिली. या परीक्षेत त्याला यश मिळाले. युरोपमधील जर्मनी, फ्रान्स व स्वीडन देशातील विविध संस्थांमध्ये त्याला एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमएस करण्याची संधी मिळाली. त्याला स्वीडनच्या लुलीया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी व फ्रान्सच्या टोल्यूस विद्यापीठाकडून एकाचवेळी दोन पदव्युत्तर पदव्या मिळाल्या. त्यानंतर त्याने स्वीडनच्या एका स्पेस लॅबमध्ये काम करण्यास सुरवात केली.

किरोना टेक्‍निकल विद्यापीठात तो रिसर्च इंजिनिअर म्हणून जॉईन झाला. नंतर गोंगस्पेस कंपनीत काम केले. स्टोनरिज या अमेरिकन कंपनीत तो नंतर रुजू झाला. पुढे त्याला एक आव्हानात्मक काम मिळाले. हेवी ट्रक जे की चालकविरहीत असतात, त्यामध्ये एअरोइंजिनिअरिंगचे तंत्र वापरण्याबद्दल मोठे संशोधन सुरू झाले. या प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रयोग केला गेला. नंतर म्हैसूर व स्वीडनच्या मित्रांसमवेत नॉर्डिक मायक्रोएव्हीनिक्‍स कंपनी स्थापन केली. हा त्याचा स्टार्टअप यशस्वी झाला. या कंपनीच्या माध्यमातून त्याने एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये संशोधन सुरू केले. त्याचे संशोधन युरोपच्या स्पेस रिसर्चसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. उपग्रहासाठी लिक्विड प्रपोल्शनचा उपयोग करण्याच्या विशिष्ट तंत्राचे हे संशोधन आहे. त्याच्या या संशोधनाची दखल घेत युरोपियन स्पेस एजन्सीने त्यांच्या कंपनीसोबत नुकताच एमओयू (सामंजस्य करार) केला आहे.

धनंजय बरबडेचा प्रवास

  • प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ स्कूलमध्ये

  • ऑर्किड इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण

  • युरोपियन स्कॉलरशिपच्या परीक्षेतील यशाने मिळाली आयुष्याला कलाटणी

  • युरोपच्या एअरोस्पेस क्षेत्रात मोठे संशोधन

  • स्वतःची नॉर्डीक मायक्रोएव्हिनिक्‍स कंपनीची स्थापना

करिअरबद्दल लवकर अवेअर व्हा

मला सोलापूरच्या तरुणांना आवर्जून काही सांगायचे आहे. विदेशात संधी भरपूर आहेत. आपल्याला नेमके कोणत्या क्षेत्रात काम करायचे ते अगोदर निश्‍चित केले पाहिजे. त्याबाबत अवेअर असायला हवे. आयडिया, इन्स्पिरेशन व डायरेक्‍शन या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एकदा ध्येय ठरल्यानंतर त्या क्षेत्रात नेमके काय सुरू आहे व कोणत्या व्यक्ती नेमके काय काम करत आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी आवश्‍यक त्या टोफेलसारख्या परीक्षांची तयारी करता येते. लवकर ध्येय ठरवा व त्या दिशेने नियोजनपूर्वक आपल्याला त्या क्षेत्रात योग्य पद्धतीने पोचायचे आहे हे निश्‍चित व्हावे.

- धनंजय बरबडे, स्टॉकहोम स्वीडन

क्रांतिकारक कार्य

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी देशवासीयांना खरी चेतना व गती मिळाली ती ऑगस्ट क्रांतीने. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 74 वर्षे पूर्ण लोटली आहेत. भारत देश आणि देशवासीय आपल्या कार्यकर्तृत्वातून विविध क्षेत्रात क्रांती घडवत त्याची जगाला दखल घ्यायला भाग पाडत आहेत. आजच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने अशाच काही क्रांतिकारक यशोगाथांचा घेतलेला हा आढावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT