do you want a job or own business career option education Sakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरी हवी का स्वतःचा व्यवसाय

करिअर निवडीमध्ये कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शिक्षण घेऊन नोकरी मिळवावी की, कौशल्य शिक्षण घेऊन एखादा व्यवसाय सुरू करावा?

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. उमेश दे. प्रधान

करिअर निवडीमध्ये कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शिक्षण घेऊन नोकरी मिळवावी की, कौशल्य शिक्षण घेऊन एखादा व्यवसाय सुरू करावा? आता जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारसरणीतून हे द्वंद्व असेच सुरू राहणार. पण मग नोकरी आणि व्यवसाय यांची तुलना करून आपल्याला जे पटतंय आणि जमणार आहे.

त्याला आपलेसे करणे आवश्यक आहे. कशाचा स्वीकार करायचा, हे अर्थात प्रत्येकाच्या मनोप्रवृत्तीवर आणि हिमतीवर अवलंबून असते. नोकरी करणाऱ्याला नेहमी व्यवसाय करणाऱ्यांचे कौतुक वाटते आणि व्यावसायिकांना नोकरी करणाऱ्यांचा हेवा, परंतु हे असेच चालायचे. जावे त्याच्या वंशा... एवढे मात्र खरे.

नोकरी आणि व्यवसाय या दोन्हींमधील बलस्थाने आणि आव्हाने यांचा विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. सर्वांत महत्त्वाचा असेल तो तुमचा आत्मविश्वास, हिंमत, चिकाटी असे गुण की, ज्यामुळे तुम्ही नोकरी काय किंवा व्यवसाय काय अपेक्षित यश आणि स्वास्थ्य दोन्ही अनुभवू शकाल. करिअर काय नोकरीत राहून ही करता येते आणि व्यवसायात पडूनसुद्धा.

नोकरी करणे म्हणजे एक आरामदायी आयुष्य घालवण्यासारखे आहे. यात कमीत कमी रिस्क फॅक्टर. महिनाभर काम केल्यानंतर पगाराची निश्चिती. दरवर्षी साधारण वाढत जाणारा पगार आणि तुमच्या नोकरीची नेहमीचीच रचना. वर्षभरात ठरावीक सुट्यांची हमी. शिवाय नोकरीत जोखीम कमी. व्यवसाय धंद्याच्या तुलनेने नोकरीत आव्हाने कमी, त्यांची तीव्रता कमी.

परंतु नोकरीत नवीन काही करून दाखवण्यावर मात्र मर्यादा असतात. आपल्या मनात आले म्हणून आपण कोणतेही निर्णय घेता येत नाही. जे ठरवून दिले आहे, त्या कार्यपद्धतीनेच नियमित काम करत राहावे लागते. ठरावीक साच्याचे, ठरवून दिलेले काम करत रहावे लागते. त्यामुळे कामात तोच तोचपणा हा ठरलेला. इतर जबाबदाऱ्यातून मुक्तता.

व्यवसायात आहे आर्थिक आणि नव निर्मितीचे स्वातंत्र्य. मनात येतील ते निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जेवढे कष्ट घ्याल तेवढा पैसा तुम्ही कमावू शकणार. त्यामुळेच सर्व कामात तुम्हाला वैयक्तिक समाधान साधता येणार. त्याबरोबरच प्रगती साधण्यासाठी तुम्हाला सतत धडपडत राहावे लागणार.

याच बरोबरीने अनेक आर्थिक आव्हानांना तुम्हाला सतत तोंड देत राहावे लागणार. एका वेगळ्याच जबाबदारीने व्यवसायात राहावे लागते. ताणतणाव आणि स्पर्धा तर नेहमीचीच असणार.

त्याचा सामना करण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार. सुटी नाही याची खूणगाठ बांधावी लागेल. वेळेची खात्री प्रत्येक बाबतीत द्यावी लागेल. त्यामुळे आजचे उद्यावर चालणार नाही. प्रत्येक बाबतीतील अनिश्चितता मन ग्रासून टाकण्याची शक्यता. ती झेलण्याची तयारी हवी. तसेच काम करवून घेण्याची हातोटी बाळगायला हवी.

दोन्हीमधील बलस्थाने आणि आव्हाने पाहता आपण कशाची निवड कराल ते ठरवा आणि तसा अभ्यास सुरू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT