Machine Engineering Sakal
एज्युकेशन जॉब्स

विशेष : यंत्र अभियांत्रिकी संधींचा चढता आलेख

इतिहास उलगडून पाहिल्यास अभियांत्रिकीचे मूळ स्थापत्य आणि यंत्र अभियांत्रिकीतून झाल्याचे आढळून येते. काळाप्रमाणे त्यात विद्युत अभियांत्रिकीची भर पडली.

सकाळ वृत्तसेवा

इतिहास उलगडून पाहिल्यास अभियांत्रिकीचे मूळ स्थापत्य आणि यंत्र अभियांत्रिकीतून झाल्याचे आढळून येते. काळाप्रमाणे त्यात विद्युत अभियांत्रिकीची भर पडली आणि ह्या तिन्ही शाखांना मूळ शाखा म्हणून संबोधण्यात येते, कारण कुठल्याही उद्योगासाठी ह्या तिन्ही मूलभूत शाखांचे ज्ञान लागते. मानवी जीवनातील यंत्रांचा वापर वाढत गेल्यावर या शाखेचा विस्तारही वेगाने झाला आणि त्याच्या डिझाइन, प्रॉडक्शन, इंडस्ट्रिअल, मटेरियल्स, थर्मल आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी उपशाखा झाल्या. वस्तूच्या निर्मितीशीच निगडित असल्यामुळे यंत्र अभियांत्रिकीचा संबंध इतर प्रत्येक अभियांत्रिकी शाखेशी येतोच. जिथे जिथे उत्पादन आणि निर्मिती तिथे तिथे यंत्र अभियंता लागतोच.

प्रयोगशील शाखा

रचना, निर्मिती आणि वितरण त्रिसूत्री असल्याने ही शाखा अत्यंत प्रयोगशील आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, ग्राहकांच्या बदलत्या आवडी-निवडी आणि मागणीनुसार शाखेच्या कक्षा रुंदावत आहेत. थ्री डी प्रिंटिंग वा आडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग ही अत्यंत नावीन्यपूर्ण उत्पादन प्रक्रिया आहे. याद्वारे अत्यंत क्लिष्ट आकाराच्या वस्तू निर्माण करता येतात. ही प्रकिया आता प्रत्येक क्षेत्रात लागू होत आहे आणि यासाठी मनुष्यबळाची भविष्यात गरज लागले. दुसरे महत्त्वाचे क्षेत्र मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग, लेझर कटिंग, इडीएम, एसीएम. अणुविद्युत, यंत्रे, शस्त्रक्रियेची साधने यांचे सुटे भाग उत्पादित करताना अत्युच्च अचूकता लागते आणि ती या प्रक्रियांद्वारे साधता येते. तिसरे क्षेत्र म्हणजे यंत्रमानव निर्मिती आणि उपयोग. यंत्र मानवाचा उपयोग आता उत्पादन क्षेत्राबरोबरच, संरक्षण, आरोग्यसेवा, धोकादायक कामे, अंतराळ अभ्यास, घरकाम आदी क्षेत्रांमध्ये होत आहे. यातील अत्यंत उदयोन्मुख क्षेत्र यंत्र अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा याचे एकत्रीकरण. आरोग्यसेवेसाठी कमी खर्चात आधुनिक आणि नावीन्यपूर्ण उपकरणे उपलब्ध करून देणे आव्हान आहे.

आरोग्यसेवा व इलेक्ट्रिक वाहने

कोरोना महामारीमुळे व्हेंटिलेटरची कमतरता अधोरेखित झाली आहे आणि बऱ्याच अभियंत्यांनी फार कमी वेळात त्याची निर्मिती केली आहे. आरोग्यसेवत प्रत्यारोपण क्षेत्रातही यंत्र अभियांत्रिकीचा उपयोग होत आहे. रुग्णाच्या शरीराच्या गरजेप्रमाणे प्रत्यारोपण तयार करणे आणि त्याचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या प्रभावाचा आधीच अंदाज वर्तविणे याचा समावेश होतो. दंतशल्यचिकित्सा आणि हाडाशी संबंधित शस्त्रक्रियेमध्ये याचा वापर सुरू आहे. इतर व्याधीसंबंधी संशोधनासाठी हुशार यंत्र अभियंत्याची गरज आहे. भारतातील आणि एकूणच जगभरातील आरोग्यसेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता उपकरणांची निर्मिती, त्यांची निगा राखणे तसेच या आस्थापनांतील शीतगृहे आणि वातानुकूलित यंत्रणा याची देखभाल कराण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. विद्युत वाहनाच्या निर्मितीचे मोठे क्षेत्र उदयास येत असून, बॅटरी व्यवस्थापन व चार्जिंग त्यातील आव्हाने आहेत. ड्रोनचा उपयोग आता संरक्षणाबरोबर टेहळणी, छायाचित्रण, शेती व्यवस्थापन या कामांसाठी होत आहे. या वाहनाच्या निर्मितीत आणि नवीन अनुप्रयोगांचा शोध यात खूप संधी आहेत. नवनवीन धातू, मिश्रधातू आणि इतर पदार्थांवर संशोधन करून, त्यातून नवनिर्मिती साधने यासाठी खूप वाव आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीशी संबंध असल्याने या शाखेत भविष्यात अनेक संधी आहेत.

- प्रा. डॉ. गणेश काकांडीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT