job education  sakal
एज्युकेशन जॉब्स

मानससूत्र : परिणाम पूर्वग्रहांचे

कोणत्याही व्यावसायिक अथवा उत्पादन क्षेत्रात ‘ग्राहक सेवा’ महत्त्वाची ठरते; पण ही सेवा देणारा कर्मचारी एखाद्या समुदायाचा विरोधक असेल,

सकाळ वृत्तसेवा

डाॅ. जयश्री फडणवीस

पूर्वग्रहांचे आयुष्यावर अनेक विपरीत परिणाम होतात. नोकरी, व्यवसाय; तसंच वैयक्तिक आयुष्यही विस्कळित होतं.

अयोग्य, अप्रामाणिक तसंच अन्यायकारक वर्तन : पूर्वग्रह ठेवल्यानं कोणालाही नोकरीवर घेताना अयोग्य निवड करणं; लायक व्यक्तीची बढती स्वतःच्याच पूर्वग्रहांमुळे रोखून ठेवणं, अशा प्रकारचं अन्यायकारक वातावरण अनेक संस्थांमधून दिसून येतं. त्यावर कडी म्हणजे संस्थाचालक जरा हलक्या कानाचा आणि अवतीभोवती पूर्वग्रहदूषित कर्मचाऱ्यांचा वावर. अशा परिस्थितीचा खोलवर परिणाम संस्थेच्या प्रगतीवर होताना दिसू लागेल. कारण योग्य, कुशल; तसंच प्रतिभासंपन्न व्यक्तीची निवड केली जात नाही अथवा त्यांना टिकू दिलं जात नाही.

ग्राहक सेवा : कोणत्याही व्यावसायिक अथवा उत्पादन क्षेत्रात ‘ग्राहक सेवा’ महत्त्वाची ठरते; पण ही सेवा देणारा कर्मचारी एखाद्या समुदायाचा विरोधक असेल, तर त्याच्या पूर्वग्रहांमुळे त्या विशिष्ट समुदायातील ग्राहकाला उत्तम, दर्जेदार सेवा दिली जात नाही. त्यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसानही होऊ शकतं; तसंच काही टक्के ग्राहकही तुटत जातील.

विपणन संशोधन (Market Research) : कोणत्याही वस्तूची निर्मिती आणि विक्री उत्कृष्ट दर्जाची होण्याकरिता सर्वप्रथम ‘विपणन संशोधन’ म्हणजेच ‘मार्केट रिसर्च’ केला जातो. ज्यायोगे उत्पादन; तसंच विपणनाचं धोरण ठरवता येतं; पण संशोधक जर नकळत एखाद्या भौगोलिक भागातील (demographic) संशोधन पूर्वग्रहांमुळे टाळत असेल, तर अपूर्ण अहवाल तयार होईल, एखाद्या प्रभागाचं अंतरंग नीट समजून न घेतल्यानं अचूक ‘मार्केट रिसर्च रिपोर्ट’ मिळणार नाही.

पुरवठादार आणि विक्रेता (supplier and vendor) : व्यावसायिकानं सतत ओळखीचा, आपल्या समुदायाचा असा भेदभाव करत उत्पादनासाठी लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करणारा; तसंच उत्पादित मालाचा विक्रेता निवडला, तर लागणारा पैसा आणि प्रत या दोन्ही गोष्टींवर परिणाम होईल. याकरिता व्यावसायिकानं स्वतः; तसंच कर्मचाऱ्यांच्या पूर्वग्रहांपासून सतर्क राहायला हवं.

मानवी नातेसंबंध : कुटुंबीय; तसंच मित्रपरिवाराशी वागताना, बोलताना पूर्वग्रहदूषित संवादांमुळे नात्यातील गैरसमज वाढत जातील, मित्रपरिवारही दुरावेल. नकारात्मक विचारांचा पगडा स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वाद्वारे परिणाम करू लागतो. ‘मी नक्की कोण आहे, कसा आहे?’ याचा संभ्रम वाढू लागतो. हळूहळू आत्मसन्मान ढासळू लागतो. मागोमाग शारीरिक आरोग्यही बिघडू लागतं. ॲसिडिटी, अपचन; तसंच ब्लडप्रेशरसारख्या व्याधींनी सुरवात.

पूर्वग्रहांमुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. जीवनमूल्यं आणि नैतिकता यांच्यावरही गंभीर परिणाम दिसू लागतात. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःतील पूर्वग्रह नकीच दूर करायला हवेत.

एका प्रसिद्ध कंपनीची HR head नेहा तिची बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता; तसंच कर्मचाऱ्यांची अचूक निवड करण्याकरता कॉर्पोरेट क्षेत्रात नावाजलेली होती; पण तिच्यातही एक पूर्वग्रह होता. एका विशिष्ट प्रदेशातील लोक तिच्या टीममध्ये कधीच काम करू शकणार नाहीत, असं तिचं ठाम मत होतं; पण एकदा त्याच प्रदेशातून आलेला विजय जरा वेगळा वाटला. हुशारच होता तो; पण नेहाचं मन ते स्वीकारत नव्हतं.

तिच्या एका सहकाऱ्यानं विजयला एक संधी देण्याची नेहाला गळ घातली. जरा नाराजीनंच तिनं विजयला कामावर घेतलं. विजयनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याच्या नवीन संकल्पना; तसंच उत्तम दर्जाचं काम, कितीही तास काम करण्याची तयारी या गुणांचा कंपनीला खूप फायदा झाला आणि नेहानंसुद्धा आपले पूर्वग्रह स्वतःच्या; तसंच इतरांच्याही प्रगतीस बाधक ठरू शकतात, हे स्वीकारलं. कोणत्याही व्यक्तीस नीट समजून घ्यायला हवं. घटनांचा सखोल अभ्यास करायला हवा. ज्या क्षणी आपण पूर्वग्रह बाजूला सारून आयुष्याकडे बघू. त्या क्षणी आपलं आणि इतरांचंही आयुष्य आनंदी आणि संपन्न होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT