PSL 2026 Dates Announced
esakal
PSL 2026 scheduled to clash with IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी आज अबु धाबी येथे मिनी ऑक्शन होणार आहे. या लिलावापूर्वी आयपीएलचे सीईओ हेमांग आमीन यांनी IPL 2026 च्या तारखा जाहीर केला. २६ मार्चला आयपीएल २०२६ ची सुरुवात होईल आणि ३१ मे रोजी फायनल खेळवली जाणार आहे. आता आयपीएलच्या तारखा जाहीर होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी मुद्दाम खोडा घालणारी कृती केली आहे. आशिया चषक न दिल्याने नक्वी भारतीयांच्या आधीच डोक्यात गेले आहेत, त्यात त्यांच्या या नव्या घोषणे आणखी संताप वाढला आहे.