Skill
Skill sakal
एज्युकेशन जॉब्स

न्यू नॉर्मल : किमान कौशल्यांची आवश्यकता

डॉ. प्राची जावडेकर

गेले वर्षभर आपण अनेक सेक्टर, अनेक क्षेत्रांचा परिचय करून घेतला. विमान वाहतूक, बंदर, रस्ते, रेल्वे, ही पायाभूत सुविधांमधील प्रमुख क्षेत्र, त्यांची धोरणं कशी विकसित झाली.

गेले वर्षभर आपण अनेक सेक्टर, अनेक क्षेत्रांचा परिचय करून घेतला. विमान वाहतूक, बंदर, रस्ते, रेल्वे, ही पायाभूत सुविधांमधील प्रमुख क्षेत्र, त्यांची धोरणं कशी विकसित झाली, त्या मागचा विचार यांच्या कथा वाचल्या. कधी आपण अक्षय ऊर्जा, उत्तम आरोग्य, बदलणार भारतीय पर्यटन याची कहाणी ही ऐकली.

या सर्व अभ्यासात मला वारंवार जाणवलं ते असं,

१) सर्व क्षेत्रांची प्रगती ८.९ टक्के या वेगाने होत आहे.

२) सर्व क्षेत्रात मिळून ८३.५७ बिलियन डॉलर एवढी नवीन परकीय गुंतवणूक, आजपर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक भारतात आली आहे. आणि ८० लाख इतके नवीन रोजगार निर्माण झाले आहेत ज्यात ३.५ टक्के गतीने भर पडणार आहे.

३) माणसांच्या बुद्धी बरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) हा मोठा बदल सर्व क्षेत्रात येणार आहे. यासाठी बनवलेल्या विविध ध्येय धोरणांची अंमलबजावणी पुढील पाच ते दहा वर्षांत पूर्ण झालेली दिसेल.

नवीन नीती, नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. याचा परिणाम म्हणून नोकरीद्वारे मिळणाऱ्या रोजगारापेक्षा स्वयंरोजगाराच्या अधिक संधी निर्माण होत आहेत. म्हणून व्यवसायांची निर्मिती आणि व्यावसायिकांची संख्या वाढवावी लागणार आहे. अर्थात दोन्हीसाठी नव्या क्षमता तयार करणे ही प्राथमिक गरज आहे. केवळ पदवी घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना व्यावसायिक जबाबदारीची कौशल्ये शिकवणे हे अपरिहार्य बनत आहे. तसेच आपण ज्या शाखेचे ज्ञान घेतो त्या शाखेशी संलग्न काम करण्याची संधी सर्वांनाच मिळेल असेही नाही. यासाठी मनाची जडणघडण लवचिक दृष्टिकोन, नवं शिकण्याची तयारी, प्रशिक्षण अशा अनेक नवीन बाबी नव्या जगाचा भाग आहेत.

या नव्या आव्हानांना समजून हे करण्यासाठी आम्ही तयार आहोत का? बदलत्या व्यावसायिक स्वरूपाशी जुळवून घेताना आपण स्वतःचा परीघ विस्तृत करत आहोत का? असे अनेक स्वयं मूल्यमापनाचे प्रश्न युवकांना पडत आहेत. कायमस्वरूपाची नोकरी, थेट निवृत्तिवेतन घेऊन बाहेर पडणे हे स्वरूप कालबाह्य होत आहे. येणाऱ्या काळात स्वतःची स्वतःला ओळख आणि नव्या जगासाठी स्वतःला तयार करण्यासाठी किमान कौशल्य आत्मसात करायची गरज आहे. ती ओळखून आम्ही ‘लाईफ सीईओ’ हा नवीन उपक्रम घेऊन येत आहोत.

समाजाला समोर जाताना तुमच्या कौशल्यांची पायाभरणी घरातून होते.

  • व्यावसायिक कौशल्य

  • मूलभूत जीवन कौशल्य

  • कम्युनिकेशन स्किल

  • घरातील सहसंवाद

  • नेटवर्किंग

  • कौटुंबिक संबंध

  • प्लॅनिंग

  • गृह व्यवस्थापन, वैयक्तिक शिस्त

  • प्रॉब्लेम सॉल्व्हिंग

  • परस्पर सामंजस्य

  • सीएसआर

  • व्यक्तिगत मूल्य, इतरांची काळजी घेण्याची सवय.

  • व्यवसायाचे बजेट

  • घरातील पैशाचे व्यवस्थापन, नियोजन

  • वर्क स्ट्रेस

  • सवय वैयक्तिक आणि गृह स्वास्थ्याची

  • लीडरशिप अँड मॅनेजमेंट

  • गृह व्यवस्थापन जबाबदारी

व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया ठरणारी ही मूलभूत कौशल्ये पूर्वी घरातून सहज मिळत होती. मात्र आता यंत्रवत जीवन शैलीत कुठेतरी हरवत आहेत. अशी कौशल्य घेऊन ‘लाइफ सीईओ’ येत आहे. आपल्या दैनंदिन जगण्यामधील कार्यकुशलता वाढवणारा उपक्रम! आयुष्यात आपणच आपल्याला घडवू शकतो यावर भर दिला आहे. हे विषय हाऊस, वेलनेस, मॅनेजमेंट, आणि सोशल स्किल अशा चार उपविभागातून मांडले आहेत. आपल्या पूर्ण दिनक्रमात तणावरहित, आनंदी आणि सर्व क्षमता परिपूर्णपणे वापरता येण्यासाठी ही मूलभूत कौशल्य हवी आहेत. या कौशल्याचा विचार आम्ही एकसूत्रपणे सलग एका आकृतिबंधात केला आहे. याला आधार आहे व्यवस्थापन, शैक्षणिक तत्त्वाचा, जीवन मूल्यांचा, तत्त्वज्ञानाचा, आणि शास्त्राचा. जानेवारीपासून सुरू होणार आहे कौशल्याची पायाभरणी या कोर्सद्वारे निश्चितच करून घेऊ शकता. याची अधिक माहिती info@lifeceo.in वर मिळेल. आपण वाचकांनी या लेखमालेला प्रतिसाद दिलात, मराठीतून हा विषय मांडण्याची संधी मला ‘सकाळ’ने दिली यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT