Railway Sakal
एज्युकेशन जॉब्स

न्यू नॉर्मल : कात टाकणारी रेल्वे !

रेल्वेचे उत्पन्न आणि रेल्वेची जोडणी हे दोन्ही सुरळीत गतिमान दळणवळणासाठी महत्त्वाचे आहे.

डॉ. प्राची जावडेकर

रेल्वेचे उत्पन्न आणि रेल्वेची जोडणी हे दोन्ही सुरळीत गतिमान दळणवळणासाठी महत्त्वाचे आहे.

रेल्वेचे उत्पन्न आणि रेल्वेची जोडणी हे दोन्ही सुरळीत गतिमान दळणवळणासाठी महत्त्वाचे आहे. भारतात धावणाऱ्या वंदे-भारत, तेजस, गतिमान, राजधानी, शताब्दी एक्स्प्रेस, उदय एक्स्प्रेस लोकप्रिय गाड्या आहेत.

रेल्वेचे बदलत गेलेले रूप आणि पसारा बघताना माझा पहिला राजधानी एक्स्प्रेसमधून केलेला प्रवास आठवतो. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व उत्तरप्रदेश या राज्यातील भूभाग पाहत, वेगवेगळे पदार्थ चाखत केलेला राजेशाही थाटाचा प्रवास होता.

उत्तम वातानुकुलित डबे, पूर्ण दृश्य दिसणाऱ्या काचेच्या खिडक्या, स्थानकांची माहिती देणारे फलक, चविष्ट खानपान, उशी पांघरूण हा सरंजाम भारतीय रेल्वेच देऊ जाणे. प्रत्येक आर्थिक स्तरातील प्रवासी वर्गाची गरज पूर्ण करणाऱ्या या रेल्वे गाड्या, एक्स्प्रेस गाड्यांसोबत मेल, पॅसेंजर, लोकल आणि आता शहरांना दिलासा देणारी मेट्रो हा असा हा अवाढव्य पसारा आहे.

दिल्ली मेट्रोची झालेली वाढ ही मी गेल्या एका दशकात पाहिली. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडिट मिळवणारी दिल्ली मेट्रो जगातील पहिली आहे.

जुलै ३०ला दिलेल्या राज्यसभेच्या उत्तरात आश्विन यांनी १०४० किसान-रेलने ३.३८ लाख टन माल वाहून नेला अशी माहिती दिली. करोना काळात रेल्वेने दाखवलेल्या कार्यक्षमतेचे व तत्परतेचे कौतुक आहे. कृषी उड्डाण किसान रेल म्हणजे शेतमाल, फळभाज्या, धान्य या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारी रेल्वे. याचा प्राथमिक उद्देश उत्पादन केंद्रांना बाजार पेठांशी जोडून शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढवणे हा आहे.

कोविड काळात ४१५५ ‘श्रमिक स्पेशल’ गाड्या चालविल्यामुळे ५७ लाखाहून अधिक प्रवाशांना त्यांच्या मूळ राज्यात जात आले. याच काळात रेल्वेने देशभरात ३,८१६हून अधिक रेल्वेचे डबे कोविड केअर कोच म्हणून उपलब्ध करून दिले. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजा ओळखून रेल्वेने सुसज्यता वाढवली. भारतीय रेल्वेची इंजिन स्वतःची वाफेवर चालणारी लोकोमोटिव्ह, इलेक्ट्रिक, सीएनजी अशी बदलत गेली. अन्य गाड्यांसाठी इंजिनाची निवड व वापर एकूण अंतर, रेल्वे ट्रॅकची लांबी, गेज, अंदाजे वजन, गाडीचा प्रकार या सर्व घटकानुसार ते ठरते. त्याचे शास्त्रही रंजक आहे. भारतीय बनावटीची ही इंजिन चित्तरंजन लोकोमोटिव्ह वाराणसी, पटियाला येथे बनतात. या इंजिनाला जोडले जाणारे डबे ज्यामुळे रेल्वेगाडी बनते तेही भारतीय बनावटीचे आहेत. पायाभूत सुविधांच्या निर्मितीत इतर क्षेत्रांप्रमाणे रेल्वेतही खासगी भागीदारीचे पीपीपी मॉडेल आता रुजत आहे. यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी, संपूर्ण रेल्वेच्या अंतर्गत सेवा डब्यांची निर्मिती अंतर्भूत आहे. पेरांबुन्दर, कपुर्थळा, रायबरेली, लातूर इथे रेल्वेच्या बोगी फॅक्टरी आहेत.

भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानक भारतातील पहिले पीपीपी मॉडेल आधारित व आयएसओ प्रमाणित रेल्वे स्टेशन आहे. जागतिक दर्जाचे राणी कमलापती रेल्वे स्थानक वास्तुशास्त्रीय चमत्कार म्हणून बघितले जाते. इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड खानपान सेवा, तिकीट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन अन्य जबाबदाऱ्या सांभाळते. आज आय.आर.सी.टी.सी.च्या नव्या तंत्रामुळे मोबाईल फोन वापरून देखील तिकीट आरक्षण केले जाऊ शकते. जेन नेक्स्ट बुकिंग पोर्टल असं वर्णन केलं जाणाऱ्या ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून २०२०च्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला ७२०० तिकिटे आरक्षित होत आहेत. यात्रा कंपनीच्या सर्वेनुसार ‘आयआरसीटीसी’ ही आशियातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स साइट आहे, ती दिवसाला तब्बल ४ लाख बुकिंग मिळवते.

भारताने घेतलेली आघाडी भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. सरकारने दिलेल्या जाहिरातीतील पंतप्रधानांचे पुढील उद्‍गार महत्त्वाचे आहेत... ‘२१व्या शतकातील नवा भारत एकाहून एक सरस पायाभूत सुविधा उभारत आहे, जे संपूर्ण क्षेत्राचा कायापालट घडवत आहे आणि लोकांच्या जीवनात परिवर्तनही घडवून आणत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईच्या वायु प्रदुषणाची क्रिकेटपटूंना धास्ती! Sarfaraz Khan सह अनेक जणं 'मुखपट्टी' घालून खेळायला उतरले

Latest Marathi News Live Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Belgaum Schools : केपीएस मॅग्नेट योजनेमुळे हजारो सरकारी शाळांवर टांगती तलवार; बेळगाव जिल्ह्यात ग्रामस्थ रस्त्यावर

Google Photos: फोनमध्ये बोलून करु शकाल फोटोज एडिट, गुगलने लाँच केले भन्नाट फीचर

Indian Army Jobs 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! भारतीय सैन्यात स्पेशल भरती जाहीर; ट्रैनिंगनंतर लॉ स्टुडंट्स थेट लेफ्टनंट होणार

SCROLL FOR NEXT