Skill Development sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : तरुणांसाठी कौशल्य विकसन

आपले कौशल्य वाढवत राहते ती व्यक्ती सर्व प्रकारे आनंदी होते. आजच्या काळात कौशल्य विकास करणे खूप सोपे आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. रश्मी ढोबळे

आपले कौशल्य वाढवत राहते ती व्यक्ती सर्व प्रकारे आनंदी होते. आजच्या काळात कौशल्य विकास करणे खूप सोपे आहे, जिथे एकीकडे इंटरनेटवर जवळजवळ सर्व काही विनामूल्य उपलब्ध आहे, तर दुसरीकडे कौशल्य विकासाची संधी सध्या प्रत्येक घरादारात उपलब्ध आहे. श्रमाने योग्य स्रोताद्वारे त्याच्या गुण आणि कौशल्यांमध्ये केलेल्या विकासाला ‘कौशल्य विकास’ म्हणतात.

कौशल्य विकास करण्याचे अनेक मार्ग आहेत. सरकारी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोहिमांमधून शिक्षण मिळवून स्वतःचे कौशल्य सुधारणे. भारताला तरुणांचा देश म्हटले जाते, अशा परिस्थितीत त्यांच्यात कौशल्ये विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणू शकतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळही देऊ शकतील.

देशातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २०१५मध्ये केंद्र सरकारने स्किल इंडिया मिशनची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार २४ लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसाय क्षेत्रातील लागणारे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.

जेणेकरून ते स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील. ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि उद्यमिता मंत्रालयाची (MSDE) प्रमुख योजना आहे. या योजनेचा उद्देश मोठ्या संख्येने भारतीय युवकांना उद्योग-संबंधित कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे. जेणेकरून त्यांना उपजीविका चालवण्यासाठी मदत करेल. या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते स्वत:चा रोजगार सुरू करू शकतील. या योजनेंतर्गत, दहावी-बारावीमध्ये ज्यांनी शाळा सोडून दिली किंवा कमी शिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाते.

स्किल इंडिया मिशन अंतर्गत, युवा कौशल्य विकास योजनेत सामील होण्यासाठी युवकांना फी देण्याची गरज नाही. उमेदवार तीन महिने, सहा महिने किंवा एका वर्षाच्या कोर्ससाठी नोंदणी करू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते, जे देशभरात वैध असते. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रोजगार मेळाव्यातून मोठी मदत होते. सरकार यामधून बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरांनुसार प्रशिक्षण दिलं जावं, असा सरकारचा आग्रह आहे. दरवर्षी तरुणांना वर्क फोर्समध्ये समाविष्ट केले जावे. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फर्निचर व फिटिंग्ज, हस्तकला तसेच चामड्याचा उद्योग अशा सुमारे ४० तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT