Engineering Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

वाटा शिक्षणाच्या... : इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी...

बारावी सायन्स झालेल्या व एमएचसीईटीची परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते, की आपल्याला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा.

डॉ. संग्राम पाटील, MD FRCA FFPMRCA, ग्वेनेड हॉस्पिटल, नॉर्थ वेल्स, यूके

बारावी सायन्स झालेल्या व एमएचसीईटीची परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते, की आपल्याला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा. करिअर उज्ज्वल होण्यासाठी असे वाटणे साहजिकच आहे. कारण जवळपास ४ ते ५ लाख खर्च करून करिअर होणार नसेल तर पैसे, वेळ वाया जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची निराश होते. ही निराशा ४ वर्षांनी होऊ नये यासाठी प्रवेश घेतानाच योग्य कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यास पुढील त्रास नक्कीच टाळता येतो.

प्रवेश घेताना पुढील गोष्टींचा विचार करा

1) अभ्यासक्रम : आपण प्रवेश घेऊ इच्छितो त्या कॉलेजचा अभ्यासक्रम हा अद्ययावत आहे का किंवा त्याचा आपणास स्व-उद्योग सुरू करण्यास मदत होईल का, याचा विचार करावा. अभ्यासक्रम तयार करताना बाहेरील कंपनीमधील, तसेच शैक्षणिक तज्ज्ञ व्यक्तींचा त्यामध्ये किती सहभाग आहे ते तपासून पाहा. आपण त्यांना अभ्यासक्रम तयार करताना बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होते त्याचा संपर्क नंबर मागून घ्या व त्यांच्याशी बोला. असा संपर्क नंबर देणाऱ्या महाविद्यालयाने आपला अभ्यासक्रम चांगला केलेला आहे असे मानण्यास हरकत नाही.

2) इंडस्ट्रिअल ट्रेनिंग : विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ३ ते ६ महिन्यांसाठी संपूर्ण वेळ इंडस्ट्रिअल ट्रेनिंग असणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीमध्ये खरोखरच कसे कामकाज होते हे समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होऊन नोकरीच्या वेळेस तो अनुभव उपयोगी पडतो. काही कॉलेजमध्ये हा अभ्यासक्रम १ महिन्यासाठी दिलेला असतो. विद्यार्थ्यांना३ ते ६ महिने काम करायचे आहे, त्या कंपन्या कॉलेजने शोधून देणे गरजेचे आहे.

3) अनुभवी शिक्षक : कॉलेजमध्ये काही अनुभवी शिक्षकांच्या बरोबर नवीन शिक्षकही असणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थी आपल्या शंका मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकतात.

4) प्लेसमेंट विभाग : अभ्यासक्रमाइतकाच प्लेसमेंट विभागही महत्त्वाचा आहे. या विभागाचे काम प्रथम वर्षापासूनच असणे गरजेचे आहे. शेवटच्या वर्षी ज्या कंपन्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी येणार आहेत, त्यांना लागणाऱ्या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात असतील असे नाही. अशावेळी त्या लागणाऱ्या गोष्टी प्लेसमेंट विभागामार्फत पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. याचा विचार करणारे कॉलेज आठवड्यातील एक दिवस त्यासाठी राखून ठेवते. त्या अभ्यासक्रमाची तयारी प्रथम वर्षापासूनच करण्यास सुरवात करते.

5) परकीय भाषा : विद्यार्थ्याला ४ वर्षांच्या अभ्यासक्रमाबरोबर एखादी परकीय भाषा शिकवणे गरजेचे आहे. कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतील तर त्यांची अपेक्षा असते, की त्या कंपनीचे मुख्यालय असलेल्या देशामधील एक भाषा विद्यार्थ्यांना यावी. त्यासाठी कॉलेजने अतिरिक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे.

6) इंडस्ट्रिअल टूर (अभ्यास दौरा) : विद्यार्थ्याला ४ वर्षांच्या अभ्यासक्रमात विविध कंपनीत इंडस्ट्रिअल टूर (अभ्यास दौरे) काढणे गरजेचे आहे. कंपनीत कोणकोणत्या विभागात कसे काम चालते कंपनी काय काम करते, कोणकोणत्या क्षेत्रात काम होते याची माहिती विद्यार्थ्याला शिक्षण घेतानाच मिळण्यास मदत होते.

7) प्रवेशप्रक्रिया : अनेकदा पालकांना व विद्यार्थ्याला संपूर्ण प्रवेश प्रक्रिया माहीत नसते. कोणत्या कॉलेजला किती टक्के/पसेंटाईल लागते याचीही माहिती नसते. ती करून घेणे गरजेचे असते.

कॉलेजबरोबर शासनमान्य खासगी विद्यापीठेही स्थापन झालेली आहेत. त्यांची स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया असते. अशा विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. अभ्यासक्रम अद्ययावत करण्याची मुभा असते. त्यामुळे काळानुसार, औद्योगिक गरजेनुसार तेथे अभ्यासक्रम असू शकतो. अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व गोष्टींची खातरजमा करावी. सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून, माहिती गोळा करूनच कॉलेज/विद्यापीठ निवडावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT