Agriculture College Baramati Sakal
एज्युकेशन जॉब्स

डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता

बारामती येथील एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

- मिलिंद संगई

बारामती येथील एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

बारामती - येथील एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

कृषी,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अधिपत्याखालील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. अशा प्रकारची मान्यता मिळवणारे हे राज्यातील एकमेव खाजगी महाविद्यालय आहे.

यामध्ये एम. एससी. (कृषी) अंतर्गत कृषी विद्या, मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र, भाजीपाला शास्त्र, फळशास्त्र, कृषी कीटक शास्त्र, वनस्पती रोग शास्त्र, कृषी विस्तार व संवाद, कृषी अर्थशास्त्र, अनुवंश व रोग पैदास शास्त्र, पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र यासह एमबीए (कृषी) , व कृषी व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

सदर पदवीधर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व शुल्क निश्चिती आणि शिक्षण विषयक कार्यप्रणाली यांचे सनियंत्रण करण्याचे अधिकार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांना राहणार आहेत.

या संदर्भात प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी केले आहे.

https://maha.agriadmissions.in या संकेतस्थळावर 13 ऑगस्ट पर्यंत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ची सुविधा उपलब्ध आहे.

कृषी विषयातील नवीन संधी

या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याची संधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यामुळे हे एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे, याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT