Engineeri sakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरी-बाजारपेठ : उद्योगांच्या मनुष्यबळाची खरी गरज ओळखा!

कुशल मनुष्यबळ सर्वच उद्योगांना समोरील मोठे आव्हान बनले आहे. देशातील जवळजवळ सर्वच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना प्रारंभिक स्तरावरील मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

सुधीर मेहता

कुशल मनुष्यबळ सर्वच उद्योगांना समोरील मोठे आव्हान बनले आहे. देशातील जवळजवळ सर्वच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना प्रारंभिक स्तरावरील मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. मुळात आपल्या देशात १८ ते ३० या वयोगटातील युवा वर्गाची संख्या जगात सर्वाधिक आहे. असे असताना, उद्योगांना चांगले मनुष्यबळ मिळत नसल्यास गांभीर्याने विचार करायला हवा. उद्योग, शासन आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रितपणे या आव्हानाला सामोरे जाऊन यावर उपाय शोधायला हवा. यावर तोडगा काढला, तर सर्वांनाच फायदा होणार असून देश म्हणून हे आपले प्रचंड यश असेल.

इलेक्ट्रिक व्हेईकलच्या मागणीत सातत्यपूर्ण वृद्धी होत आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञानातील विशेषज्ज्ञ आणि कुशल कर्मचारी/व्यावसायिकांची उद्योगासाठी गरजही वाढतीच आहे. यामध्ये बॅटरी प्रणाली, वाहनातील विद्युत ऊर्जा पुरवठा संरचना, चार्जिंग सेंटरसारख्या पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या सर्वांचे एकीकरण या सर्वांचा समावेश आहे.

आमच्या ‘इकेए’ संस्थेत आम्ही मोबिलिटीची शाश्वत आणि फायदेशीर उत्पादने विकसित करीत आहोत. ज्यात संकरित ऊर्जापुरवठा संरचना, इंधनघटाधारित वाहने, अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि शहरातील मोबिलिटीच्या विविध समस्यांवर उपाय आदींचा समावेश आहे.

बदलते तंत्रज्ञान

या क्षेत्रातील तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत आहे, त्यामुळे पूर्णपणे तयार मनुष्यबळ मिळणे अशक्य आहे. या नवीन संरचनेसाठी चाकोरीबाहेरचा विचार करणारे, कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल. असे टॅलेंट कसे तयार होईल याचा विचार शिक्षण संस्थांनीही अभ्यासक्रम तयार करताना करायला हवा. विद्यार्थ्यांनी तातडीने उद्योगांना आवश्यक असणारी स्कील घेण्याला प्राधान्य द्यायला हवे.

मल्टिटास्टिंगचा अभाव

आजच्या मनुष्यबळामध्ये मल्टीटास्किंगच्या मूलभूत कौशल्यांचा अभाव दिसतो. वाहन उद्योगक्षेत्र सध्या ज्या प्रकारच्या संक्रमणाचा सामना करत आहे, तो पाहता ही चिंताजनक बाब आहे. सध्याच्या उमेदवारांमध्ये संयम, स्थिरता आणि दबाव हाताळणीची क्षमता यांची मोठी उणीव जाणवते.

ते अधिक जिज्ञासू आहेत आणि सतत अन्यत्र काहीतरी शोधत असलेले आणि त्यामुळे अस्थिर वर्तनाचे दिसतात. उद्योगाच्या मागण्या समजून घेणे व त्यानुरूप स्वतःस बदलणे व त्यासाठी उद्योगातून अधिक अनुभव मिळवणे, क्षमता विकसित करणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावे.

कार्यक्षम कर्मचारी

कोणत्याही उत्पादन, अभियांत्रिकी किंवा ऑटोमोटिव्ह कंपनीसाठी शॉप फ्लोअरवर अत्यंत कुशल आणि कार्यक्षम कर्मचारी वर्ग तयार करणे ही काळाची गरज आहे. नावीन्य आणण्यासाठी किंवा मूल्यनिर्मितीसाठी शॉप फ्लोअर हा व्यवसायाचा मुख्य भाग आहे. त्यासाठी योग्य तांत्रिक किंवा अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा मजबूत पाया असणे आवश्यक असते.

उत्पादन प्रक्रिया आणि कार्यपद्धती, गुणवत्ता आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन, समस्यांचे निवारण करण्याची क्षमता असे मनुष्यबळ ही सध्याची गरज आहे. ‘मेक-इन-इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ मोहिमेची आमची महत्त्वाकांक्षी पर्यावरणीय उद्दिष्टे लक्षात घेता, आमच्याकडे असलेल्या प्रचंड टॅलेंट पूलचा योग्य अपस्किलिंगसह लाभ घेणे महत्त्वाचे आहे.

वाहन डिझाइन, बॅटरी मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डेव्हलपमेंट इत्यादींवर व्यावहारिक ॲप्लिकेशन्स तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तयार करायला हवा.

(लेखक पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ईकेए मोबिलिटी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT