Career 
एज्युकेशन जॉब्स

करिअर ‘ती’चे  : 'कले'च्या विस्तीर्ण आकाशी... 

डॉ. सुलभा नितीन विधाते

मागील लेखामध्ये आपण पदविका कोर्सेस पाहिले. आता या लेखामध्ये कला शाखेतील करिअरच्या वाटा पाहू या. प्रथमतः सर्व मुलींना माझे असे सांगणे आहे, की कला शाखेला अजिबात कमी लेखू नका. या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यावर वेळेची उपलब्धता खूप असते. म्हणून मिळालेला वेळ चांगल्या कामासाठी वापरावा. बीए डिग्री घेताना इतर कोर्सेस किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते. वकील, CLAT या परीक्षा देता येतात. देशातील विधी अभ्यासक्रमांच्या टॉप महाविद्यालयात प्रवेश मिळवता येतो.

फॅशन व टेक्सटाईल डिझाईन - हा दोन वर्षाचा पी. जी. कोर्स आहे. अनेक मुली यात सहभागी होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अन्न, वस्त्र व निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. म्हणून त्या संबंधित सर्व व्यवसायांना खूप संधी आहेत. आजच्या युगात पोशाख विविध पद्धतीने शिवणे या क्षेत्राला प्रचंड वाव आहे. सृजनशीलता वापरली तर ग्राहकांना आकर्षित करून भरपूर पैसा मिळविता येतो. ऑफिसवेअर, ट्रेंडी लुक, ट्रॅडिशनल ड्रेस अशी विविधता आहे. आजच्या ‘मॉल’ संस्कृतीमध्ये कपडे खरेदीला खूप प्राधान्य आहे. म्हणून फॅशनपासून टेलरिंगपर्यंत या करिअरची व्याप्ती आहे. 

रिटेल व फॅशन मर्चंडाइज - वरील सर्व मुद्द्यांशी संलग्न असा हा उच्च स्तरावरील व्यवसाय आहे. बीए किंवा एमए झाल्यावर शिक्षक/प्रोफेसर होता येते. बी.एड. केल्यावर शिक्षण क्षेत्रात संधी आहे. नेट/सेट परीक्षा दिल्यावर कॉलेजमध्ये संधी प्राप्त होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल व्यवस्थापन - फक्त देशातच नाही, तर परदेशातही या व्यवसायाला स्कोप आहे. हॉटेल व्यवसायाशी संबंधित आर्ट्स ग्रॅज्युएट होता येते. यात विविध संस्थांचे कोर्सेस आहेत. त्यासाठी त्यांचे स्वतःचे निकष आहेत. डिप्लोमा-डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा एमबीए इन टुरिझम हे मार्ग उपलब्ध आहेत. माझा एक विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून लंडन येथे ‘शेफ’ म्हणून गेला, तर दुसरा विद्यार्थी जहाजावर ‘शेफ’ म्हणून कार्यरत आहे. स्वतःची आवड, आव्हाने पेलण्याची क्षमता व आयुष्य याची सांगड घालता आली पाहिजे. 

सरकारी नोकरी - UPSC/ MPSC/ स्टाफ सिलेक्शन यांची तयारी करून परीक्षा देता येतात. सरकारी नोकरीत उच्चपदस्थ होता येते. 

मीडिया क्षेत्र - पत्रकारिता व अँकरिंगचे खूप कोर्सेस उपलब्ध आहेत. भाषा व्यवहार, भाषा कौशल्य, डायनॅमिक कोर्स, प्रसारमाध्यमे, आकाशवाणी, वर्तमानपत्र, जाहिरात, निवेदक, संहिता लेखक, माहितीपट लेखन, मुद्रितशोधक, प्रकाशन या विविध संधी तुम्हाला खुणावत आहेत. भाषेवर प्रभुत्व असल्यास भाषांतरकाराची संधी आहे. 

बॅचलर इन फाइन आर्टस - हा चार वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. बी.एफ.ए. इन ॲनिमेशन, बी.एफ.ए. इन म्युझिक व्हायोलिन, डिप्लोमा खालील चित्रणामध्ये दाखविला आहे. 

फाईन आर्टस 

  • फोटोग्राफी 271 महाविद्यालये 
  • ग्राफिक आर्टस 
  • डिप्लोमा इन हिंदुस्थानी क्लासिकल 
  • शिल्पकला (भारतात 21 महाविद्यालये) 
  • नृत्यकला व दिग्दर्शन (51 महाविद्यालये) 
  • सितार, तबला 
  • व्होकल, लाइट व्होकल 

सध्या इव्हेंट मॅनेजमेंट जोरात चालू आहे. लग्न, मुंज, पार्टी, छोटे समारंभ, गेट टुगेदर यासाठी ऑर्डर दिली जाते. त्यामुळे या व्यवसायामध्ये कल्पकता वापरल्यास चांगले करिअर आहे. मॉल मॅनेजमेंट व डायनॅमिक कोर्स हे उत्तम करिअर आहे. व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत. You be the change हे तत्त्व अंगिकारल्यास कला, छंद जोपासून बहुविध प्रज्ञेचा वापर केल्यास करिअरचे विस्तीर्ण आकाश अपुरे पडेल अशा संधी उपलब्ध आहेत. हवा आहे तो आत्मविश्वास, प्रचंड मेहनत करण्याची तयारी व नावीन्याचा स्वीकार! 
कला शाखा ही ‘कलेचा आत्माविष्कार आहे. ती सातत्याने जोपासली पाहिजे. 

हे मना, घे तू उत्तुंग भरारी। 
‘कलेच्या’ विस्तीर्ण आकाशी।। 

असेच म्हणावे लागेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT