Career 
एज्युकेशन जॉब्स

करिअर ‘ती’चे : नव्या युगाच्या नवविद्याशाखा

डॉ. सुलभा नितीन विधाते

माहितीतूनच ज्ञान मिळते, असे म्हणतात. आजच्या युगात माहितीचा उपयोग कोण कशा प्रकारे करतो या गोष्टीला मोठे महत्त्व आहे. आज आंतरजाल (इंटनेरट), माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) काळात संगणक प्रणालीत व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमांवर आपण व्यक्त होतो किंवा गुगल सर्चचा वापर करून जी माहिती शोधतो. ती माहिती आपल्या नकळत साठवून तिचे विश्लेषण करून त्याचा उपयोग केला जातो. या माहितीला ‘विदा’ (डेटा) असे म्हणतात. 

आपण फेसबुक पाहताना आपल्यासमोर विविध जाहिराती येतात, फेसबुकवर आपल्या ओळखीचे कोण कोण लोक आहेत हे सुचवणे, गुगलवर एक माहिती शोधताना त्याच्याशी संलग्न इतर गोष्टी दिसणे, ‘उबर’ किंवा ‘ओला’वर टॅक्सी मागवणं या सगळ्याच गोष्टी ‘विदा विज्ञान’ आहे.

‘विदा विज्ञान’ ही एक मोठी विस्तारित ज्ञानशाखा आहे. त्यात सांख्यिकी, संगणक विज्ञान, माहिती विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, विदागर व्यवस्थापन, विदेचे देवाण घेवाण असे बरेच विषय येतात.  

विदा विज्ञानातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे मशिन लर्निंग. यात निरनिराळ्या अल्गोरिदम (आज्ञावली) असतात. असलेल्या माहितीतून पॅटर्न शोधायचा आणि त्यावर गृहितके मांडायची, त्याचे विश्लेषण करायचे. मशिन लर्निंगचा उपयोग e-mail filtering व Computer vision (स्वयंचलित गाड्यांच्या प्रणालीत) केला जातो व न्यूरल नेटवर्क आज्ञावली तयार करून विविध गेम्स तयार केले जातात. हे एक प्रचंड मोठे करिअर आहे. यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमान वर्तणूक करू शकणारी यंत्रे. यात नियोजन, संयोजन, उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज व चेहरा ओळखण्याची क्षमता असते. अशी ही प्रचंड मोठी शाखा आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण जानेवारी २०२१पासून ही लेखमाला सुरू केली. दर बुधवारी आपण भेटत गेलो. औपचारिक शिक्षणात करिअर घडविताना शालेय जीवनापासूनच्या स्पर्धा पाहिल्या, त्यासाठी अभ्यासतंत्रे पाहिली. यशस्वी होण्याचे मार्ग अभ्यासले. उपलब्ध असलेले विविध करिअर कोर्सेस पाहिले. मुलींनो, आकाशात झेप घ्यायची असल्यास स्वतःची आवड, कल, जिद्द व मेहनत करण्याची तयारी हवी. माझ्या दोन जिवलग मैत्रिणी आहेत, ज्या डॉक्टरेट पदवी मिळूनही त्या गृहिणी होत्या. मात्र, वयाच्या ४५ वयानंतर त्यांचे १३-१४ पेशंट आज देश विदेशात गेलेले आहेत. बुद्धिमत्ता मूलभूत संशोधनाची आंतरिक तळमळ व प्रयत्न हे गुण हवेत मुलींनो! 

लेखांमधील उल्लेख झालेली सर्व क्षेत्रे मुलींना ‘खुणावत’ आहेत. योग्य करियरची निवड करून आयुष्यात खूप यशस्वी व्हा! सबल व सक्षम महिला बना!  धन्यवाद!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT