girl-career 
एज्युकेशन जॉब्स

करिअर ‘ती’चे  : मार्ग ‘यशवंत’ होण्याचे!

डॉ. सुलभा नितीन विधाते

आपण मागील लेखात स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा ही तंत्रे अभ्यासली. मुलीचे वय वाढते, तसे तिच्या मानसिकतेत व शरीरात बदल होत जातात. याचा परिणाम कळत-नकळत वर्तनावर होतो. कधी लाजाळू, अबोल, भित्री तर कधी धाडसी, बिनधास्त व outspoken बनते. या वर्तनाचा परिणाम शिक्षणावर निश्‍चितच होतो. या शारीरिक व मानसिक बदलांच्या जहाजात योग्य विचारांचे ‘सुकाणू’ योग्य करिअरकडे तिला घेऊन जाते. 

मुलींची इयत्ता वाढते तसा अभ्यासही वाढतो. अभ्यासपद्धती बदलतात. वेळ तेवढाच असतो; विषयांची संख्या वाढते. फक्त माहिती असून चालत नाही, तर आकलनक्षमता वाढविणे आवश्‍यक असते. म्हणूनच या दुसऱ्या टप्प्यात MTS, NTS, NMMS या परीक्षांसाठी आवश्‍यक अभ्यासपद्धती पाहणार आहोत. ‘करिअर’च्या राजमार्गावर जाण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करणे गरजेचे असते. 

अभ्यास करावा नेटका
या वयोगटात सर्व विषयांना समान महत्त्व देणे गरजेचे आहे. एका विषयाला कमी, एकाला जास्त असे उपयोगी नाही. कारण, शिक्षण प्रणालीमध्ये सर्वांगीण विकास साधण्यासाठीच त्या त्या वयोगटात/ इयत्तेत ते-ते विषय दिलेले असतात. आताच्या नवीन शिक्षणप्रणालीमध्ये इयत्ता आठवीपासूनच व्यावसायिक शिक्षणाचा प्रवाह व तोही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार दिला आहे. याचा फायदा विद्यार्थिनींना होणार आहे. मुलीची आवड, तिच्या अंगी असणारे गुण व कष्ट घेण्याची तयारी यानुसार कार्यक्षेत्र ठरविता येईल. या विभाजनामुळे सर्व व्यवसायांना समान महत्त्व राहील. हुशार, मध्यम, अप्रगत अशी विभिन्नता न राहता सर्वांना समान संधी मिळेल. या सर्वांसाठी विशिष्ट अभ्यासपद्धती आवश्‍यक आहेत. निरीक्षण क्षमता, माहिती संकलन, मुख्य घटकाचे विभाजन 4-5 घटकात करणे, चित्रांचा अभ्यास करणे, अवघड मुद्दा पुन्हा-पुन्हा वाचणे, मुख्य मुद्द्यांखाली अधोरेखन करणे या पद्धती वापरून कठीण किंवा सोपा भाग आत्मसात करता येतो. यासाठी मात्र शारीरिक व मानसिक बैठक आवश्‍यक आहे. ‘अभ्यास करावा नेटका,’ असे म्हटले जाते. मेंदूच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करायचा असल्यास गाण्यातून अभ्यास, लयबद्ध चालीत भाषा विकसित करतात. नोट्‌स काढणे, पुस्तकाचं वाचन, उजळणी व मित्र-मैत्रिणींसोबत अभ्यासाच्या मारलेल्या गप्पा, चर्चा प्रभावी ठरतात. यातूनच परीक्षेत आदर्श उत्तरे कशी लिहावीत हे कळते व इथूनच प्रवास-स्पर्धेचा सुरू होतो. 

नियोजनाला महत्त्व
अभ्यासनियोजन, टाइम स्टडी, दैनंदिन नियोजन आवश्‍यक असते. आळशीपणा टाळणे, महत्त्वाच्या गोष्टी आधी कशा पूर्ण करणे, उपलब्ध वेळात अधिकाधिक अभ्यास करणे, एकाग्रता वाढविण्यासाठीच्या सोप्या पद्धती या गोष्टी शिकून घ्याव्यात. प्रथम बहुपर्यायी प्रश्‍नांचा अभ्यास, निबंधात्मक व व्यक्तिनिष्ठ प्रश्‍न कसे लिहावेत हे शिकावे. स्वतःची मते मांडावीत. आपल्या कौटुंबिक व्यूहरचनेत मुलींना बोलण्याचे किंवा मत मांडण्याचे प्राधान्य कमी असते. आता समाजरचना बदलली आहे. म्हणूनच ‘आत्मभान’ राखून आईने मुलीला याबाबतीत सक्षम करायलाच हवे. अभ्यासाचा खरा ‘आत्मा’ वाचन आहे. वाचनामुळे आपले विचार आपण निर्भिडपणे मांडू शकतो. नियमित लिखाण आवश्‍यक आहे. केवळ पास होण्यापुरते ज्ञान नसावे, तर त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी झाला पाहिजे. संकटांना सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्‍वास, स्वतःला शिस्त लावणे अत्यंत आवश्‍यक आहे. सोशल मीडियामुळे मुलींचा खूप वेळ अनावश्‍यक खर्च होतो. मेंदूत योग्य विचारांची पेरणी न होता चुकीचे विचार जाण्याची शक्‍यता असते. म्हणून या उपकरणांचा वापर तारतम्याने व विधायक कारणांसाठी कसा करावा याचे शिक्षण आवश्‍यक आहे. 

थोडक्‍यात, विविध विषयांचे ज्ञान, झोपणे, मस्ती करणे, खेळणे, वृत्तपत्राचे वाचन, अवांतर पुस्तक वाचन व तणावमुक्त राहणे यातच यशवंत होण्याचा मार्ग आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT