Sports Opportunity 
एज्युकेशन जॉब्स

करिअर ‘ती’चे  : संधी क्रीडाक्षेत्रातील

डॉ. सुलभा नितीन विधाते

आज महिला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याला क्रीडाक्षेत्रही अपवाद नाही. पूर्वी या क्षेत्रात मुलींचे प्रमाण कमी होते; पण आता काळ बदलला आहे. मुली उज्ज्वल कामगिरी करून देशाचे नाव उंचावत आहेत. उदाहरणार्थ, २०१६ च्या ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाने ११७ खेळाडूंना संधी दिली. एकूण २०० संघांपैकी भारताचा क्रमांक पदक तालिकेत ६७ वा होता व तेही दोन महिलांमुळे. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावले, तर कुस्तीमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक पटकावून भारताची लाज राखली. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑलिंपिकमध्ये २०१६ च्या ऑलिंपिकपर्यंत वैयक्तिक क्रीडाप्रकारात फक्त ८ पुरुषांना व ५ महिलांना पदक मिळालेली आहेत. यावरून असे दिसते, की पुढे भारतीय महिला खेळाडू अधिक चमकणार आहेत. 

प्रत्येक स्त्रीला शारीरिक शिक्षण व खेळण्याचा मूलभूत अधिकार आहे. शासनाकडून महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. खरे तर देशात ‘क्रीडा धोरण’ जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध खेळांचे आयोजन केले जाते. यात ७० पेक्षा जास्त खेळात मुलींना सहभागी होण्याची संधी वयाच्या ११ व्या वर्षापासूनच प्राप्त करून दिली जाते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१) ११ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये इयत्ता ३ री ते ५ वीच्या मुली सहभाग घेतात. 
२) १४ वर्षांखालील मुलींच्या गटात इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुली सहभागी होतात. 
३) १७ वर्षांखालील मुलींच्या गटात इयत्ता १२ वीपर्यंत शिकत असलेल्या मुली सहभागी होतात. 

ओपन महिला गट, इनडोअर व आऊटडोअर अशा स्पर्धांमध्ये मुलींना संधी आहे. कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्‍स, व्हॉलिबॉल, रायफल शूटिंग, आर्चरी, योगासने, मार्शल आर्टस, हॉकी इत्यादींमध्ये मुली फक्त सहभागी होत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील उत्तम कामगिरी करतात. उदाहरणार्थ, योगासनांमध्ये मुळशीची श्रेया कंधारे, किक बॉक्‍सिंगमध्ये सैनिकी शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी मांडेकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

शासनातर्फे मुलींसाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबविली जात आहेत. उदाहरणार्थ, पायका स्पर्धा, स्वयंसिद्धा संरक्षण कार्यक्रम. इयत्ता १० वी व १२ वीतील खेळाडूंसाठी ग्रेस गुणांची तरतूद आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना पुढीलप्रमाणे गुण दिले जातात : 

जिल्हा : ५, विभाग : १०, राज्यस्तर सहभाग : १२, प्रावीण्य : १५, राष्ट्रीय स्तर सहभाग : १५, प्रावीण्य : २०, आंतरराष्ट्रीय प्रावीण्य : २५ गुण. यामुळे अनेक खेळाडूंना लाभ झाला आहे. 

तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षणदेखील आहे. या खेळांतून नोकरीच्या विविध संधी आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, संघटक एवढ्यापुरते मर्यादित विश्‍व न राहता स्पोर्टस सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्‌स जर्नालिझम, स्पोर्टस फिजिओथेरपिस्ट, स्पोर्टस मॅनेजमेंट, स्पोर्टस ऍडमिनिस्ट्रेटर, जिम इन्स्ट्रक्‍टर, ऍथलिट मॅनेजर इत्यादी संधी उपलब्ध आहेत. क्रीडा साहित्य, मैदान तयार करण्यासाठी व महिला खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध असतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करावी. जो खेळ मुलीला आवडतो, तो खेळण्याची संधी द्यावी. यासाठीच तर ‘शारीरिक शिक्षणा’चा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. ‘हार को गले नहीं लगाना और जित को सिर पे मत चढाना’ असे वागून पुढे जावे. ‘खेलो इंडिया’ हा नारा भविष्याचा वेध घेत आहे. भारत एक विश्‍वगुरू बनण्यासाठी मुलींनो खूप खेळा, आभासी दुनियेतून बाहेर पडा. मैदाने तुम्हाला खुणावत आहेत : तंदुरुस्त व निरोगी महिला निर्माण करण्यासाठी!  

पुढील लेख अशाच साहसी खेळांचा असेल. भेटूया पुढील बुधवारी!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT