Career Decision Sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा

करिअर, शाखा, संस्था निवड करताना ज्या मुद्यांचा विचार करायचा त्यांची एक पडताळा सूची करून त्याआधारे आपल्या निर्णयाची परीक्षा आपणच घेतली तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन नक्की लाभेल.

डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

करिअर, शाखा, संस्था निवड करताना ज्या मुद्यांचा विचार करायचा त्यांची एक पडताळा सूची करून त्याआधारे आपल्या निर्णयाची परीक्षा आपणच घेतली तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन नक्की लाभेल.

करिअर, शाखा, संस्था निवड करताना ज्या मुद्यांचा विचार करायचा त्यांची एक पडताळा सूची करून त्याआधारे आपल्या निर्णयाची परीक्षा आपणच घेतली तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन नक्की लाभेल. अमुक एक मुद्दा लक्षातच घेतला गेला नाही असे होणार नाही. आपला निर्णय समाधानकारकच असेल, आत्ता आणि भविष्यातही शांतपणे आणि काही निकषांवर आधारित विचार करणं आवश्यक आहे. अंधपणे केलेली कोणतीही निवड ही धोकादायकच. स्वतःचे प्रतिसाद काय आहेत हे पहा आणि निर्णयाकडे वळा. आत्मपरिक्षणाचे हे मुद्दे तुम्हाला नक्कीच दिशा दर्शवतील. काही नमुना प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आणि काही पालकांसाठी.

विद्यार्थ्यांसाठी पडताळा सूची...

  • मी निवड केलेल्या शाखेत, करिअरमध्ये, कॉलेजमध्ये माझी आवड आहे ना?

  • केलेली निवड माझी आहे ना? मी कुणाच्या दबावाखाली निर्णय घेत नाहीए ना?

  • निवडलेल्या शाखेमधील, करिअरमधील फायदे आणि तोटे यांचा विचार केला आहे ना?

  • या शाखेसाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीचा, कष्टांचा मी परिचय करून घेतला आहे का?

  • जमले नाही तर माझा दुसरा पर्याय कोणता असणार आहे?

  • पुढे जाऊन मला या शाखेत, करिअरमध्ये काय करता येण्याजोगे आहे याचा मी शोध घेतला आहे का?

  • या शाखेत, करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी कितपत आहे?

  • या शाखेची, करिअरची निवड केलेल्या काही जणांशी तरी मी संवाद साधला आहे का?

  • या शाखेमध्ये, करिअरमध्ये निवड झाल्यानंतर मिळणाऱ्या मोबदल्यात मी समाधानी असणार ना?

  • निर्णय घेण्यात माझे कुटुंबीय समाधानी आणि सहाय्यक ठरतील का?

  • माझ्यासमोर काम करण्याबाबत मी कुणाचा आदर्श ठेवला आहे का?

  • या शाखेत अभ्यास करणाऱ्या किंवा या करिअरमध्ये काम करणाऱ्याशी माझे बोलणे झालेले आहे का?

  • मला निवडायच्या शाखेबाबत, करिअरबाबत माझी पार्श्वभूमी काय आहे?

  • या शाखेकडे, करिअरकडे मी का आकर्षित झालो आहे?

पालकांसाठी पडताळा सूची...

  • निवड करताना मी पाल्यावर दबाव तर टाकत नाहीए ना?

  • पाल्य निवडत असलेल्या शाखेचा खर्च मला परवडणार आहे ना?

  • पाल्याने जाणूनबुजून या शाखेची, करिअरची निवड केली असल्याची मी खात्री करून घेतली आहे ना?

  • पाल्याच्या निर्णयात, निवडीत मी लुडबूड करत नाहिए ना?

  • पाल्याला भविष्यात गरज भासल्यास या करिअरबाबत मी मदत, मार्गदर्शन करू शकेन का?

  • या शाखेबाबत, करिअरबाबत पूर्ण माहिती पाल्याने मिळवली आहे असे वाटते का?

  • माहिती मिळवण्याचे स्रोत पक्के आहेत का याची खात्री केली का?

  • पाल्याच्या निर्णयाबाबत आम्ही खूष, समाधानी आहोत का?

  • पाल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल याचा विचार केला आहे का?

  • आवश्यक ते संदर्भ साहित्य आम्ही उपलब्ध करून देऊ शकू का?

  • पाल्याला स्वयंपूर्ण होण्यासाठी काही जबाबदारी आम्ही त्याच्यावर टाकायला सुरुवात केली आहे का?

  • पाल्य आपल्यापासून काही गोष्टी लपवून ठेवत तर नाही ना याची खात्री केली आहे का?

हे आणि यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात उमटले पाहिजेत व ज्याची समाधानकारक उत्तरे तुम्ही मिळवू शकला पाहिजेत. तरंच हा करिअर निवडीचा टप्पा तुम्ही आणि तुमचा पाल्य यशस्वीपणे पार पाडू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT