counseling sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : समुपदेशनात संवाद कौशल्य

संवाद साधणं ही एक कला आहे. पालक, शिक्षक यांनी ही कला जरूर आत्मसात केली पाहिजे.

डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

संवाद साधणं ही एक कला आहे. पालक, शिक्षक यांनी ही कला जरूर आत्मसात केली पाहिजे.

संवाद साधणं ही एक कला आहे. पालक, शिक्षक यांनी ही कला जरूर आत्मसात केली पाहिजे. विशेषतः आपल्या मुलांसाठी आपण मार्गदर्शक आणि समुपदेशक म्हणून उभे राहणार असाल तर. ते करत असताना संवाद साधण्याचं कौशल्य आपल्यात असेल तर अनेक गोष्टी आपण साध्य करू शकता. संवाद हा एकाशी असेल किंवा एकाच वेळेस अनेकांशी असेल त्यात आपल्यातील संवाद कौशल्य हे सकारात्मक भूमिका बजावू शकते. मला काय वाटते ते मी सांगतोय परंतु तुम्हाला काय वाटतं ते देखील समजून घेणं आवश्यक. त्यासाठी तुम्ही लेखी संवादपण साधू शकता. केवळ भाषण असून चालणार नाही तर संभाषण महत्त्वाचे.

आपले विचार श्रोत्यांपर्यंत जाऊन पोहोचवणे आणि त्याच बरोबरीने इतरांचे विचार समजून घेणे या दोन्ही कृती महत्त्वाच्या. जितका बोलणारा महत्त्वाचा तितकाच ऐकणारापण. तुम्ही इतरांचं म्हणणं ऐकून घेतलं तरच तुमचे विचार ऐकायला समोरचा तयार होईल. समोरच्याला पहिला तुमचा कान द्या, त्याच्या अपेक्षा, उत्सुकता, प्रश्न समजून घ्या मगच तुमची सल्ला पोतडी उघडा. तरच तुमच ऐकायला कोणीही तयार होईल.

मार्गदर्शनाची पद्धती

मार्गदर्शनाचा संवाद साधणे म्हणजे आपलेच विचार माथी लादणे असा त्याचा अजिबात अर्थ नाही. या उलट तुमची भाषा, विचार आणि सूर समजून देण्याचा असेल तर श्रोते तुमचं म्हणणं ऐकायला तयार असतात. तुमचे विचार समजावणीचे, सूचित करणारे असतील तर ते लवकर मान्य केले जातात. म्हणूनच संवाद साधताना ‘मला असं वाटतं’, ‘माझ्या मते...’ असे शब्द वापरणं नेहमीच श्रेयस्कर. परंतु या उलट ‘मी म्हणतो तेच आणि तेवढेचं’ असं संभाषणकर्त्याचे विचार आणि मांडणी असेल तर मात्र संवाद संभवत नाही. करिअर विषयी सल्ला देत असताना आपले विचार हे थोडक्यात आणि विषयाला हात घालणारे असे मांडायला हवे. आपले म्हणणे थोडक्यातच सांगा.

समस्यांवरील उपाय

संवाद हा अनेक समस्यांवरचा उपाय ठरू शकतो. मनमोकळेपणाने साधलेला संवाद हा मन हलकं करायला, आपल्या अडचणी, समस्या सांगायला आणि पर्यायाने उत्तर, इलाज मिळवायला सोपा जातो. संवाद साधताना आपले विचार शांतपणे मांडावेत. ऐकणाऱ्याच्या मनात गडबड, गोंधळ उडेल, त्याच्या संभ्रमात भर पडेल असे व्हायला नको. तुमच्या संवादात विषयाबद्दल बारकावे आले तर चांगलंच.

संवाद साधताना समुपदेशकाने आपल्या देहबोलीचा सकारात्मक उपयोग करावा. ज्याच्याशी संवाद साधत आहात त्याच्या डोळ्यात बघून बोला. त्यात आत्मीयता आणि वैयक्तिक लक्ष दिल्याचे जाणवते. तुमच्या मार्गदर्शनाला तुमची मुल आसुसलेली आहेत. हे काम आपण जेवढे अभ्यासपूर्णरीत्या कराल तेवढे यश आपलेच आहे. संवाद कौशल्याची ही कला आत्मसात करून पुढे व्हा म्हणजे झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT