Contemplation
Contemplation sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : चिंतन आणि मनन

डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

आपल्या अभ्यासाच्या विषयाचे केवळ वाचन लेखन करत न बसता त्याविषयीचे विचारमंथन करत ध्यानधारणा करत बसा. कोणतीही समस्या घेऊन स्वत-शीच त्याविषयीची चिकित्सा करत बसा.

शब्दांचे खरे अर्थ माहीत नसतील तर ते अनेक वेळा कानावर पडून ते बोथट आणि अर्थहीन होऊन जातात. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? नक्की काय करणे अपेक्षित आहे? ते कसे करायचे? आपण करत आहे ते बरोबर आहे का? असे अभ्यासातील अनेक शब्द कृतीत कसे उतरावायचे हे समजत नाही. असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालत राहतात. अभ्यासाचा एक मार्ग म्हणून ‘चिंतन आणि मनन’ हे शब्द आपल्यावर असे फेकले जातात. म्हणजे नक्की काय करायचे? कोणती कृती अपेक्षित आहे ते बघूया. केवळ अभ्यासाचे पाठ्यपुस्तक, वह्या, नोट्स, मार्गदर्शक उघडून बसणं म्हणजे अभ्यास नाही. हे काहीही हातात न घेताही चांगला अभ्यास होऊ शकतो.

आपल्या अभ्यासाच्या विषयाचे केवळ वाचन लेखन करत न बसता त्याविषयीचे विचारमंथन करत ध्यानधारणा करत बसा. कोणतीही समस्या घेऊन स्वत-शीच त्याविषयीची चिकित्सा करत बसा. तुम्ही कुठेही असलात तरी मनात असा विचार ठेऊन जगणं, राहणं म्हणजेच चिंतन आणि मनन. स्वत- घेतलेला शोध, आलोचन आणि केलेला विमर्श हा या चिंतनाला महत्त्व निर्माण करून देतो. मनात अन्य विचार घर करण्याअगोदर, त्यांना दूर सारून आपल्या अभ्यासातील विषयावर लक्ष केंद्रित करत राहणे हेच तर चिंतन. मनात विषय घोळवत ठेवणे त्यासाठी आवश्यक. स्वत-शीच संवाद साधल्यास योग्य उत्तरे सापडतात. मनात तो विषय पक्का होऊन जातो. त्यासाठी तुम्हाला तुमचेच अगदी खास मित्र बना.

परीक्षेच्या वेळेस एखादी उत्तरांची टेप डोक्यात वाजावी त्याप्रमाणे आपल्याला उत्तरे आपोआप आठवायला लागतात. तो आपल्या सवयीचा भाग बनून गेलेला असतो. प्रश्नांची उत्तरे पाठ करत राहण्यापेक्षा, उत्तरामधील तार्किकता, अर्थात कार्य कारण भाव लक्षात घेऊन ते परत परत करत राहिले तर हे चिंतन योग्य दिशा घेऊ लागते. चिंतनात एखाद्या समस्येबद्दल बहू अंगाने सखोल विचार करणे अपेक्षित असते. केवळ एकाच अंगाने आहे ते आठवून पाहणे म्हणजे मनन होत नाही तर सर्व बाजूंनी विचार केल्याने आपला अभ्यास पक्का होण्यास मदत होते. अशा वेळेस केवळ मनातल्या मनात चिंतन करण्याबरोबर पाटीवर किंवा कागदावर आपले मुद्दे लिहून काढायची सवय लावून घ्या.

दिवसातील काही वेळ तरी त्यासाठी राखून ठेवलाच पाहिजे. परंतु तो वेळ एक गुणवत्तापूर्ण अशा संपादणुकीसाठी द्यायला हवा. त्यात आपल्याला योग्य उद्दिष्ट साध्य करता यायला हवे. चिंतन आणि मनन याची सवय लावून घ्या. अभ्यास डोक्यात रहायला मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT