Hard Study
Hard Study Sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : अभ्यासातील मेहनत

डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

जीवनाच्या विविध टप्प्यावर ध्येय, लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आपण करत असतो. दृढ संकल्प, योग्य नियोजन आणि कृतिप्रवण राहणे या माध्यमातून आपले लक्ष्य गाठून संकल्प सिद्धीस नेऊ शकतो.

जीवनाच्या विविध टप्प्यावर ध्येय, लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आपण करत असतो. दृढ संकल्प, योग्य नियोजन आणि कृतिप्रवण राहणे या माध्यमातून आपले लक्ष्य गाठून संकल्प सिद्धीस नेऊ शकतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक लक्ष्य पूर्ण करण्याचा एकमेव मूलमंत्र म्हणजे अभ्यासाचे कार्य न थकता, न थांबता करत राहणे अर्थात यालाच म्हणतात मेहनत घेणं. अशी मेहनत की ज्याला काही पर्याय असू शकत नाही. अभ्यासातील ही मेहनत कशात आहे हे समजून घेणं महत्त्वाचं.

अभ्यासासाठी कशा प्रकारची मेहनत घ्यायला हवी? असा प्रश्न आपल्याला पडतो. मोठ्यांचा सल्ला हा नेहमी मेहनत घ्या असा असतो. म्हणजे कोणती कृती ते जाणून घेणं आवश्यक. तासनं तास वाचत, लिहीत बसणं याला मेहनतच म्हणायचं. विविध समस्या, प्रश्न सोडवणं, प्रश्नपत्रिका परत परत सोडवणं, हे सर्व अभ्यासातील मेहनतीचेच प्रकार. वेळच्या वेळी शंका निरसन करून घेणं, एकदा चुकलेलं परत लिहून काढणं, झालेल्या चुका समजून घेऊन पुन्हा आपल्या उत्तराचा मसुदा बदलून लिहिणं. हीच ती मेहनत. लिहिणं आणि वाचणं यापेक्षा विविध माध्यमातून उत्तराचा पाठपुरावा सातत्याने करणं. न कंटाळता आणि अभ्यासाची बैठक न मोडता सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करणं हा मेहनतीचाच भाग. आपण जो वेळ अभ्यासाकरिता देतो त्यापेक्षा तो जास्त देणं, त्याचा वेळ वाढवणं आणि इतर गोष्टींना काही काळ दूर ठेवून आपले लक्ष अभ्यासावर एकाग्र करणं. यालाच तर म्हणतात मेहनत.

आपली आवड ही अनेक गोष्टीत असते. क्षणात आपल्याला खेळाला जावेसे वाटते, तर फिरायला जायला मन आसुसलेले असते, मोबाईल पहायला तर आपल्याला आवडतच असते. खायला आपल्याला कोणत्याही वेळी चालते. अशी आपली मनोवृत्ती असेल तर मग अभ्यासाची मेहनत कधी होणार? जे जे आपल्याला अभ्यासापासून प्रवृत्त करते त्यापासून दूर राहून स्वतःला अभ्यासात गढून टाकणं हाच तर मेहनतीचा भाग. अभ्यासात दंग असणं, दक्ष रहाणं ही अभ्यासूपणाची लक्षणं विकसित करणं आवश्यक. आपली धडपड ही प्रामाणिक असायला हवी. म्हणूनच अभ्यासात गुणवत्ता हा निकष ठेवून प्रयत्न करत रहाणं हे केवळ तुमच्या नियमित अभ्यासावरच अवलंबून आहे.

अभ्यासाची मेहनत ही सतत घ्यायला हवी. केवळ परीक्षेच्या आधीच्या दिवशी अभ्यासाचे कष्ट करून वर्षभर त्यापासून दूर राहणे योग्य होणार नाही. त्या मेहनतीत नियमितता हवी. रोज थोडा थोडा अभ्यास केला तरच तो उपयुक्त ठरु शकतो. आयत्यावेळचे परिश्रम काय कामाचे? अशा या अभ्यासाच्या वृत्तीमुळे तो तुमचा एक सहज स्वभाव बनून जायला हवा, अभ्यासाचे रूपांतर छंदामध्ये केल्यास त्यात कंटाळवाणेपणा कधीच येणार नाही. मेहनतीचे फळ नेहमी गोड असते असे म्हटले जाते. त्यासाठी रोज प्रयत्न मात्र करायला हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT