Traditional education and business sakal
एज्युकेशन जॉब्स

हटके : पारंपरिक शिक्षण आणि व्यवसाय

शालेय स्तरानंतर अकरावी व बारावी आणि मग कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त करणे, नंतर नोकरीच्या मागे लागणे या झाल्या पारंपरिक शिक्षणाच्या पायऱ्या.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. उमेश दे. प्रधान

शालेय स्तरानंतर अकरावी व बारावी आणि मग कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त करणे, नंतर नोकरीच्या मागे लागणे या झाल्या पारंपरिक शिक्षणाच्या पायऱ्या. यांचीच आता पायाभूत शिक्षण, गरजेचे आणि किमान शिक्षण म्हणून ओळख निर्माण व्हायला लागली आहे. कारण कनिष्ठ महाविद्यालयापासून विद्यार्थी संख्या रोडावत आहे. या पारंपरिक शिक्षणाच्या काय मर्यादा आहेत हे लक्षात घेऊयात.

एकतर केवळ तात्त्विक आणि पुस्तकी शिक्षण, अभ्यासाचा रोजच्या जीवनाशी असणारा कमीत कमी संबंध, रोजगाराची खात्री न देणारे शिक्षण, केवळ कारकून निर्मितीचे शिक्षण, विषयातील आशयाचा तोचतोचपणा, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे शिक्षण असे हे पोकळ स्वरूप झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्याकडील कल नक्कीच कमी झालाय.

आयुष्याची महत्त्वाची २१ वर्षे आणि अधिकचा काळ केवळ शिक्षणात घालवणं हे आजच्या तरुण पिढीला मान्य होण्यासारखे नाही. म्हणूनच कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षणाकडे लवकर वळण्याची आवश्यकता मान्य करायला हवी.

नवीन अभ्यासक्रम आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित विषय निवडण्याचे दिलेले पर्याय हे तर त्याला पारंपरिक शिक्षणापासून व्यवसाय शिक्षणाकडे आकर्षित करणारेच ठरणार आहेत. बदलत्या शिक्षण प्रक्रियेत त्यामुळे शालान्त परीक्षा या नावापुरत्याच, सोपस्कार बनून राहणार. पारंपरिक शिक्षण घेऊन नोकऱ्या करणारे बनण्यापेक्षा हटके शिक्षण घेऊन नोकरी देणारे बनण्याला जास्त मागणी आहे.

त्यामुळेच शालान्त परीक्षेनंतरचे असे अनेक करिअर निवडीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आवडीचे अनेक डिप्लोमा, शॉर्ट टर्म कोर्सेस सहज उपलब्ध असल्याने त्याकडे ओढा वाढता आहे. त्यातूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करता येण्याची खात्री आणि छोटी मोठी नोकरी सहजच मिळते. अगदी मोबाईल रिपेअरिंग, संगणक सर्व्हिस, ऑफिस व्यवस्थापन, केटरिंग अशा अनेक कोर्सेसची नावे सांगता येतील.

चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केल्यास वेगळे काहीतरी करण्याची गरज लक्षात येते. त्यामुळेच पारंपरिक शिक्षण घेत असतानाच अशा हटके जाणाऱ्या वाटा चालून पहायला काही हरकत नाही. कदाचित तोच तुमचा जीवनाचा राजमार्ग होऊ शकेल. शिक्षण आणि व्यवसाय याची सांगड घातली जात नाही, तोपर्यंत पारंपरिक शिक्षणाला नाकारणाऱ्यांची संख्या वाढत जाणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT