Inheritance tourism sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर अपडेट : वारसा पर्यटनात रोजगाराच्या संधी!

भारत हा उत्तमोत्तम वारसास्थळांनी समृद्ध असा देश आहे. वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या गोष्टी, वस्तू, कला, लोककला किंवा संस्कार.

सकाळ वृत्तसेवा

भारत हा उत्तमोत्तम वारसास्थळांनी समृद्ध असा देश आहे. वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या गोष्टी, वस्तू, कला, लोककला किंवा संस्कार.

- डॉ. वंदना जोशी

भारत हा उत्तमोत्तम वारसास्थळांनी समृद्ध असा देश आहे. वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या गोष्टी, वस्तू, कला, लोककला किंवा संस्कार. वारसा हा त्या काळातील, त्या विशिष्ट भौगोलिक विभागातील विचारशैली, धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, विचार प्रवाहाचे आणि त्याचबरोबर समृद्धीचे प्रतिनिधित्व करतात. वारसा हा कलेचा, ज्ञानाचा ठेवा असून त्याचे संवर्धन करून पुढच्या पिढीकडे पोहोचवणे आपले कर्तव्य आहे आणि यात पर्यटन क्षेत्र महत्त्वाचे काम करते. पर्यटनाद्वारे वारसा स्थळाची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना होत असते.

युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनमध्ये ‘वर्ल्ड हेरिटेज’ हा विभाग आहे. तो जगातील अशा सांस्कृतिक, ऐतिहासिक, कलात्मक, नैसर्गिक वास्तू यांचे संवर्धन आणि सरंक्षण करतो. वारसा पर्यटन म्हणजे एक किंवा अनेक वास्तू, कला आणि उत्सव यांचा अनुभव घेण्यासाठी केलेला प्रवास. वारसा पर्यटनासाठी राजवाडे, गड, किल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे त्याचबरोबर लोककला व अन्य गोष्टींचा समावेश होतो.

भारताचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सहावा क्रमांक लागतो. भारतात एकूण ४० जागतिक वारसा स्थळे आहेत. जागतिक पर्यटन संस्थेच्यानुसार ३१ टक्के पर्यटक वारसा व सांस्कृतिक पर्यटक आहेत. त्यामध्ये आगामी वर्षांत १५ टक्के वाढीची अपेक्षा आहे. भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी ५४ टक्के लोक भारतातील वारसास्थळाने, कला, शास्त्रीय नृत्य याने प्रभावित होतात. वारसा पर्यटन हा भारतीय पर्यटनामधील मुख्य घटक आहे. त्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवीत असतात. भारतातील वारसास्थळांची माहिती आणि त्याचे महत्त्व पर्यटकांपर्यंत पोचविण्याचे काम पर्यटनक्षेत्र करते. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यामध्ये करिअर करण्यासाठी इतिहासाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या पूर्ण माहितीसाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम किंवा पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण असल्यास फायदा होतो.

अपेक्षित कौशल्ये

  • इतिहासाचे ज्ञान - या क्षेत्रासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटकाला संबंधित स्थळाबाबत अचूक माहिती देता येऊ शकते.

  • वारसा स्थळाबद्दलची उत्सुकता - यामुळे वारसा परिसर, त्याचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व याची पूर्ण माहिती मिळते.

  • नेतृत्वगुण आणि संभाषण कला - पर्यटकांना योग्य पद्धतीने माहिती द्यायची असल्याने नेतृत्वगुण आवश्यक आहे. त्याचबरोबर संभाषण कला गरजेची आहे. ओघावत्या शैलीत पर्यटकांना माहिती देता आली पाहिजे. यासाठी भारतीय वास्तुकलेचे ज्ञान गरजेचे आहे.

कोणत्या रोजगाराच्या संधी...

  • हेरिटेज गाइड

  • म्युझियम गाइड

  • हेरिटेज टूर ऑपरेटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT