DRDO,drdo scholarship 2020 ,DRDO Scholarship Scheme 2020  
एज्युकेशन जॉब्स

मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज

सकाळ ऑनलाईन

DRDO Scholarship Scheme 2020 : 'डीआरडीओ' म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास विभागाने शालेय विद्यार्थीनींसाठी शिष्यवृतीची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत विद्यार्थीनींना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल.BE/B.TECH या M.TECH/ME च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज दाखल करु शकतात.

या योजनेच्या माध्यमातून अंडर ग्रेजुएटच्या मुलींना वर्षाला 1 लाख 20 हजार रुपये तर पोस्ट ग्रेजुएटच्या विद्यार्थीनींसाठी 1लाख 86 हजार रुपयांची स्कॉलशिप देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 40 जागा असून 30 जागा या  BE/B.TECH आणि 10 जागा M.TECH/ME च्या विद्यार्थीनींसाठी आहेत.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डीआरडीओने 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. यापूर्वी दोनवेळा स्कॉलरशिपच्या अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेमध्ये बदल केला होता.  

बीई, बीटेक, एमई, एमएससी आणि एमटेकसोबतच गेट आणि जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनी देखील या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात. डीआरडीओकडून प्रत्येकवर्षी विद्यार्थीनींसाठी ही शिष्यवृती दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थींना 4 किंवा  त्यापेक्षा कमी वर्षाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. जेईई परीक्षासह ज्या विद्यार्थींनी 2020-21 शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे त्यांनाच अर्ज करता येईल. एमई, एमएससी इंजिनिअरिंग आणि एयरोनॉटिक इंजिनियरिंग, एमटेक च्या विद्यार्थींनींसाठी 10 स्कॉलरशिपचा समावेश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT