Child Education google
एज्युकेशन जॉब्स

Child Education : मुलांचे गणित कच्चे असल्यास काय कराल ?

अनेक वेळा असंही घडतं की, मुलाला जे शिकवलं जातं, ते एक-दोन वेळा त्याला नीट समजत नाही आणि त्याच्या संकल्पनाही स्पष्ट होत नाहीत.

नमिता धुरी

मुंबई : अनेक मुलांना गणिताचा अभ्यास करायला आवडत नाही आणि त्यांना गणिताचे नाव ऐकताच टेन्शन येते. शाळेत आणि शिकवणीत समजावूनही अनेक वेळा मुलांना प्रश्न सोडवता येत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही मुलांना सहज गणित शिकवू शकता आणि या टिप्समुळे तुमच्या मुलाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होतील. (easy tricks to teach maths to your child)  हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती... 

कमतरतांवर काम करा

अनेक वेळा असंही घडतं की, मुलाला जे शिकवलं जातं, ते एक-दोन वेळा त्याला नीट समजत नाही आणि त्याच्या संकल्पनाही स्पष्ट होत नाहीत. अशा परिस्थितीत, आपण मुलाला विचारले पाहिजे की त्याला कोणत्या विषयांमध्ये अधिक समस्या येत आहेत.

मग तुमच्या मुलांच्या उणिवा पाहा आणि त्यांना गणित खेळांच्या मदतीने शिकवा जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी समजतील. (how to make maths easy)

मूलभूत संकल्पना स्पष्ट होऊ द्या

गणित शिकवण्यासाठी, आपण मुलाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी उदाहरणांद्वारे स्पष्ट करून सांगितले पाहिजे. जर तुमचे मूल लहान असेल तर तुम्ही त्याला वस्तूंच्या साहाय्याने बेरीज किंवा वजाबाकी शिकवू शकता.

एक-एक घटक समजावून सांगा

गणित शिकवताना अनेक वेळा लोक एकाच वेळी अनेक घटक शिकवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मुलाला एकाच वेळी विषय नीट समजणार नाहीत आणि त्याचे मूलभूत संकल्पनाही स्पष्ट होत नाहीत.

याशिवाय जर तुम्ही तुमच्या मुलाला लहानपणापासूनच वस्तूंशी खेळायला शिकवले तर तो खेळताना अनेक गोष्टी शिकू शकतो. तुम्ही अॅबॅकस वापरून मुलाला मोजणी, बेरीज आणि वजाबाकी शिकवू शकता. याशिवाय, व्यावहारिक शिक्षणाद्वारे तुम्ही मुलाला पटकन टेबल शिकवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT