education Announcement of Entrance exam for savitribai phule pune University
education Announcement of Entrance exam for savitribai phule pune University esakal
एज्युकेशन जॉब्स

SPPU Admission : विद्यापीठातील विभागांसाठी प्रवेश परीक्षेची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यापीठात ५४ विभाग असून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून विद्यार्थी विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात.

मागील काही वर्षांपासून विद्यापीठातील विभागांमध्ये पदव्यूत्तर पदविकांचे अभ्यासक्रम सुरू केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षा ही १०० गुणांची असून, २० गूण हे सामान्य ज्ञानावर असतात, तर ८० गुणांची संबंधीत विषयाची परीक्षा असते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक

- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ः १० जून (पदवी), १७ जून (पदव्यूत्तर पदवी)

- विलंब शुल्कासह अंतिम मुदत ः १७ जून, ८ जुलै

- परीक्षेचे संभाव्य तारिख ः

१) पदवी ः २४ ते २५ जून

२) पदव्यूत्तर पदवी ः २२ ते २५ जुलै

अधिक माहितीसाठी ः https://campus.unipune.ac.in/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT