एज्युकेशन जॉब्स

पेट्रोलियम इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचंय?जाणून घ्या संधींविषयी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्याच्या युवा पिढीची नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत असलेली उत्कंठता, तसेच इंजिनिअरिंगकडे असणारा ओघ पाहता पेट्रोलियम इंजिनिअरिंग ही एक उत्कृष्ट शाखा आहे. पण, या क्षेत्राची पूर्ण माहिती नसल्यामुळे तुलनात्मकदृष्टया कमी विद्यार्थी ही शाखा निवडतात. पेट्रोलियम प्रॉडक्टस् उदा. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

तेल आणि वायू यांचे नैसर्गिक स्रोत शोधून काढणे, त्यांची तपासणी करण्याचे काम पेट्रोलियम इंजिनिअरला करावे लागते. संबंधित कामासाठी लागणारी वेगवेगळी यंत्रसामग्री शोधून काढणे/विकसित करणे आणि जास्तीत जास्त तेल किंवा वायू जमिनीच्या पोटातून जमिनीवर आणणे हे पेट्रोलियम इंजिनिअरचे काम आहे.

पेट्रोलियम शाखा का?

१) आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी अगदी पदवीनंतरच.

२) सरकारी खासगी तेल कंपन्यांमध्ये असणारे गलेलठ्ठ पगार.

३) संशोधन आणि विकासामध्ये (R&D) असणारा प्रचंड वाव.

४) जगभ्रमंतीची संधी.

५) राहणीमान उंचावरणारे आणि उत्कृष्ट असे कामाचे स्वरूप. 

करिअर आणि अनेक शाखांचा अंतर्भाव ही या शाखेचे खास वैशिष्टे आहेत. मुलींसाठीही या क्षेत्रात प्रचंड संधी आणि सरकारी खासगी तेल कंपन्यांमध्ये आरक्षित जागा आहेत. महिलाही या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत आणि महिलांसाठी ऑफिस जॉब ही उपलब्ध आहेत.

पात्रता :

सायन्स शाखेतून बारावी केल्यानंतर पेट्रोलियम इंजिनिअरींगमध्ये बी.टेक/बी.ई करता येते. नंतर एम.ई/एम. एस. आणि पीएचडी ही करता येते. मेकॅनिकल, केमिकल, पेट्रोकेमिकल, पॉलिमर या शाखेत पदविका (डिप्लोमा) केलेले विद्यार्थी बी. टेक पेट्रोलियमला डायरेक्ट सेकंड इयरला अॅडमिशन घेऊ शकतात.

करिअरच्या संधी:

पेट्रोलियम इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेल्या उमेदवाराला या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. पेट्रोलियम तेलजन्य पदार्थाचे शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स (तेलजन्य रसायने) उपलब्ध झालेल्या स्रोतांमधून तेल बाहेर काढणे तसेच संबंधित यंत्रणा आणि पेट्रोलियम सायन्स आदी विषयामध्ये रिसर्च ही करता येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे.

येथे मनुष्यबळाची गरज

१) ओ.एन.जी.सी. २) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ३) आयबीपी कॉर्पोरेशन लिमिटेड, ४) ऑइल गॅस इंडिया, ५) ऑइल इंडिया लिमिटेड, ६) एलपीजी, ७) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ८) रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड, ९) एस्सार ऑइल अँड गॅस, १०) गेल, ११) स्लबर्जर, १२) केर्न, १३) शेल गॅस, १४) एक्झॉन मोबील

प्रशिक्षण संस्था
१) यु.पी.एस. डेहराडून. २) इंडियन स्कूल ऑफ माईन्स, धनबाद. ३) डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT