education Entrance exam for Hotel Management sakal
एज्युकेशन जॉब्स

Hotel Management : हॉटेल मॅनेजमेंटसाठी प्रवेश परीक्षा

भारतामध्ये दिवसागणिक हॉटेल व्यवसायात वाढ होत आहे. त्यात पर्यटन व हॉटेल व्यवसाय एकत्रित आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक बनला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारतामध्ये दिवसागणिक हॉटेल व्यवसायात वाढ होत आहे. त्यात पर्यटन व हॉटेल व्यवसाय एकत्रित आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक बनला आहे.

- के. रवींद्र

भारतामध्ये दिवसागणिक हॉटेल व्यवसायात वाढ होत आहे. त्यात पर्यटन व हॉटेल व्यवसाय एकत्रित आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक बनला आहे. परंतु आजही आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स म्हटले की, आचाऱ्याचा कोर्स असा गैरसमज आहे. हॉटेल मॅनेजमेंट कोर्सनंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ बनण्याची संधी मिळते.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्सला प्रवेशासाठी राज्यपातळीवर MAH-B.HMCT-CET व देशपातळीवर NCHMCT JEE या परीक्षा आहेत. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचे बंधन नसते. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

NCHMCT JEE इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) प्रवेशासाठी घेतली जाते. याअंतर्गत सुमारे २१ केंद्रीय IHM, २५ राज्य IHM, १ PSU IHM, आणि २७ खासगी IHM आहेत जे NCHMCT शी संलग्न आहेत आणि BSc (HHA) अभ्यासक्रम प्रवेश NCHMCT JEE वर स्कोअरवर आधारित आहे. तर राज्यातील विविध कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्रवेशासाठी MAH-B.HMCT-CET प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे.

परीक्षा दिनांक

NCHMCT JEE ः रविवार, १४ मे २०२३

MAH-B.HMCT-CET ः परीक्षेची तारीख निश्चित नाही

पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

  • किमान पात्रता ४५ टक्के गुणांसह १०+२ उत्तीर्ण असावा

  • अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ४० टक्क्यांपासून आहेत

  • बारावीच्या परीक्षेत बसलेले परंतु निकालाची वाट पाहत आहेत ते विद्यार्थी अर्ज करू शकतात.

  • वयाचे कोणतेही बंधन नाही

MAH-B.HMCT-CET अभ्यासक्रम

परीक्षा पॅटर्न

  • संगणक आधारित चाचणी (CBT) ऑनलाइन परीक्षा राहील

  • प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ (MCQ) प्रकाराचे १०० प्रश्न असतील

  • निगेटिव्ह गुणांकन पद्धत नाही.

  • एकूण वेळ ः ९० मिनिटे

  • भाषा ः इंग्रजी

NCHMCT JEE अभ्यासक्रम

NCHMCT JEE परीक्षा पॅटर्न

  • परीक्षेचे भाषा माध्यम इंग्रजी व हिंदी राहील

  • बरोबर उत्तराला ४ गुण मिळतील

  • चुकीच्या उत्तरला १ गुण वजा होईल, अनुत्तरित प्रश्नाला ० गुण राहील

  • संगणक आधारित चाचणी (CBT) ऑनलाइन परीक्षा राहील

  • प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ (MCQ) प्रकाराचे १०० प्रश्न असतील

  • परीक्षेचा कालावधी १८० मिनिटे (३ तास)

आवश्यक कागदपत्रे

  • बारावी (किंवा समतुल्य) परीक्षेचे गुणपत्रक

  • दहावी (किंवा समतुल्य) उत्तीर्ण प्रमाणपत्र

  • आधार कार्ड

  • रहिवासी प्रमाणपत्र

लागू पडत असल्यास ः

  • जातीचे प्रमाणपत्र

  • जात वैधता प्रमाणपत्र

  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र ३१/०३/२०२४ पर्यंत वैध (DT-A, NT-B, NT-C, NT-D आणि SBC सह OBC साठी)

महत्त्वाच्या लिंक

https://nchmjee.nta.nic.in

https://bhmctcet२०२३.mahacet.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT