initiative SNDT implement NEP Submit report to Steering Committee for implementation education  Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEP : एनईपीच्या अंमलबजावणी एसएनडीटीचा मोठा पुढाकार; अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीसमोर अहवाल सादर

विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलात आज एनईपीच्या अंमबजावणीसंदर्भात जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमबजावणी राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वात जास्त पुढे पाऊल टाकणाऱ्या श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाने(एसएनडीटी) आज आपल्याकडील अंमलबजावणीचा अहवाल राज्यात एनईपीच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या सुकाणू समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासमोरच सादर केला.

यावेळी राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सदस्य प्रा. अनिल राव, विद्यापीठाच्या कुलगुरू, डॉ. उज्वला चक्रदेव, उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलात आज एनईपीच्या अंमबजावणीसंदर्भात जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा यांनी एनईपीच्या अंमलबजावणीसंदर्भात अहवाल सादर करून त्यासंदर्भातील माहिती दिली.

यावेळी सुकाणू समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नितीन करमळकर म्हणाले, आपल्याकडे स्वातंत्र्य काळापासून शिक्षण हक्क अधिकारावर भर देण्यात आला आहे. मात्र आता नवीन धोरणात सर्वांसाठी शिक्षण हक्क यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

या धोरणात लवचिकता हा सर्वात मोठा गुण मात्र, याची नीट अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांनीही तितकाच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे डॉ. करमळकर म्हणाले. तर प्रा. अनिल राव म्हणाले, एनईपीमध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर आहे.

भारतीय ज्ञान प्रणाली, कौशल्य विकास आणि त्याला पूरक अभ्यासक्रमही भविष्यात महत्वाचे ठरतील असे ते म्हणाले. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी यावेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भातील माहिती दिली.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव म्हणाल्या, एनईपीच्या अंमलबजावसाठी आम्ही नुकतेच सर्व महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले, नाटिका, पोस्टर्स, विविध प्रकारच्या स्पर्धाच्या माध्यमातून पालक, विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्यांपासून ते व्यवस्थापनांपर्यंत एनईपी कळावी हा यामागे उद्देश होता. तो यशस्वी ठरला. विद्यापीठात एनईपीची अंमलबजावणी सुरू केली, यात स्वायत्त महाविद्यालये कशी सहभागी झाली आहेत याची माहिती त्यांनी दिली.

एनईपीवरील प्रदर्शनाचे आकर्षण

एसएनडीटी विद्यापीठात एनईपीच्या अंमलबजावणीसाठी प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाला डॉ. करमळकर, प्रा. अनिल राव यांच्यासह प्रधानसचिव रस्तोगी यांनी भेट दिली. यात मांडण्यात आलेले विषय पाहून रस्तोगी यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. अशा प्रकारे इतर ठिकाणी प्रदर्शन लावून एनईपीच्या संदर्भात जागरूकता होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : पाच किलोमीटर गाडी ढकलणार पण पेट्रोल नाही भरणार! सीमकार्डनंतर आता JIO पंपावरही कोल्हापूरकरांचा बहिष्कार...पाहा VIDEO

हा चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार’च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य १२ सप्टेंबरला उलगडणार!

Latest Marathi News Updates Live : सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्टसर्किटमुळे आग

SSC Disclosure Scheme: अंतिम यादीत नाव नाही? तरीही मिळू शकते सरकारी नोकरी! SSC च्या नव्या योजनेमुळे मिळणार संधी

Sanjay Raut : ''मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखडायचं ते उखडा''; संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज, वेगळ्या विदर्भाबाबतही केला मोठा दावा...

SCROLL FOR NEXT