Varsha Gaikwad Statement on HSC Paper Leak
Varsha Gaikwad Statement on HSC Paper Leak sakal
एज्युकेशन जॉब्स

पेपर फुटला नाही, फक्त काही भाग Whatapp वर, शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, शनिवारी पार पडलेला केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली. मुंबईच्या मालाडमध्ये एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा प्रकार समोर आला. यानंतर नगरच्या श्रीगोंद्यातही गणिताचा पेपर फुटल्याचं समोर आलंय. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Varsha Gaikwad)

मालाडमध्ये रसायनशास्त्राच्या पेपरबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. संबंधित प्रकार गंभीर असून त्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलं आहे, असं त्या म्हणाल्या. मात्र, पेपर फुटला नसून प्रश्नपत्रिकेतील काही भाग मोबाईलवर आढळल्याची माहिती त्यांनी दिली. व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिकेतील काही माहिती समोर आली होती. मालाडच्या एका खासगी क्लासमध्ये हे प्रकरण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी एका शिक्षकालाही ताब्यात घेतलं आहे.

बारावीचा पेपर,.. WhatsApp आणि प्रश्नपत्रिका

मुंबईच्या मालाडमध्ये कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असलेला पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाला. विले पार्ले पोलिसांनी याप्रकरणी यादव नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT