Satara Latest Marathi News Satara News 
एज्युकेशन जॉब्स

नाबार्डने जाहीर केला सहाय्यक व्यवस्थापकपदाचा निकाल; 'या' संकेतस्थळावर माहिती उपलब्ध

सिद्धार्थ लाटकर

सातारा : नॅशनल बॅंक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट NABARD (नाबार्ड)  ने मंगळवारी (ता. नऊ) नाबार्ड 'अ' श्रेणीचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी परीक्षा आणि मुलाखत देणारे उमेदवार नाबार्डच्या nabard.org या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहू शकतात. या परीक्षेसाठी मुलाखत 23 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले उमेदवारांनी निकाल पाहण्यासाठी खालील गोष्टींची अंमलबजावणी करावी. 

  • सर्व प्रथम nabard.org या नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. 
  • मुख्य पृष्ठावरील सहाय्यक व्यस्थापकपदाचा निकाल जेथे लिहिले आहे तेथे क्‍लिक करा. 
  • एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात. 
  • आपला निकाल पहा आणि पृष्ठ डाउनलोड करा. भविष्यातील उमेदवार हार्ड कॉपी डाउनलोड करू शकतात. 

या परीक्षेतील निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश होता. पहिला टप्पा प्राथमिक परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत, अशी होती. पहिली परीक्षा २४ सप्टेंबरला १०० गुणांची होती व प्रश्नपत्रिका I व II साठी घेण्यात आली. परीक्षेत यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. या भरती मोहिमेत सहाय्यक व्यवस्थापकाची 154 पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू झाली होती. तीन फेब्रुवारी 2020 दरम्यान संपली होती. सविस्तर माहितीसाठी उमेदवार नाबार्डचे nabard.org या अधिकृत संकेतस्थळ पाहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT