education news Sweden help for Indian students in Ukraine Anna Lakwal pune esakal
एज्युकेशन जॉब्स

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वीडनची दारं खुली

मुंबईतील स्वीडनच्या कौन्सिल जनरल ऍना लॅकवल; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंडो नोर्डीक कार्यशाळा संपन्न

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पुणे : ‘‘युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम अर्थातच संपूर्ण युरोपवर होत आहे. मात्र आम्ही त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न करत आहोत. दरम्यान युक्रेनमधील भारतीय मुलांच्या पुढील शिक्षणासाठी स्वीडनची दारे खुली असून या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करू,’’ असे आश्वासन मुंबईतील स्वीडनच्या कौन्सिल जनरल ऍना लॅकवल यांनी दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इंडो नोर्डीक सर्क्युलर इकॉनॉमी अँड बायो इकॉनॉमी वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान,  पत्रकारांशी संवाद साधताना लॅकवल यांनी ही माहिती दिली.

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मुंबईतील नोर्वेचे कौन्सिल जनरल अर्ने जॅन फ्लोलो, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. नोर्डीक्स इन इंडियाचे प्रकल्प समन्वयक डॉ. मान सिंग सिद्धू, कन्ट्री मॅनेजर रुपाली देशमुख, टेट्रा पॅक साऊथ एशियाच्या निर्जरा रस्तोगी, प्रा. सुललित बंडोपाध्याय, ओलॉफ डेलविकें, श्रीधर राव, किमो सिरा, आशा केंभवी, लेने लेंज आदींनी विचार मांडले. भारतासह स्वीडन, नोर्वे, डेन्मार्क आणि फिनलँड या देशातील उद्योग, पर्यावरण आणि शिक्षण, संशोधन आणि बाजारपेठ यांची सांगड घालत एकत्रित विकास साधण्याच्या दृष्टीने कार्यशाळेत विचारविनिमय झाले.

अर्ने जॅन फ्लोलो म्हणाले,‘‘जागतिक हवामान बदल हे वैश्विक आव्हान पेलताना अक्षय ऊर्जा आणि हरित साखळी या मुख्य गोष्टीला धरून तंत्रज्ञान वापरले पाहिजे.’’ कार्यशाळेत आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. प्रशांत फालकर, माजी विभागीय आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, पुणे नॉलेज क्लस्टरचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. अजित केंभवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदींनी आपले विचार मांडले. स्मार्ट सिटीच्या विकासाची दिशा, ग्रीन बिल्डिंग मटेरियल विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT