education news under Ex-Serviceman Reservation TET 2021 get 15 percent marks concession sakal
एज्युकेशन जॉब्स

‘टिईटी २०२१’मध्ये माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत

अर्जात दुरूस्तीसाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या ३० जून २०२२ च्या निर्णयानुसार राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना ‘शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’मध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांची माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी, तसेच नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग याबाबत दुरूस्ती करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. तसेच नावातील स्पेलिंग बदल व जातसंवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने परीक्षा परिषदेकडे आली होती.

त्याचीच दखल घेऊन परीक्षा परिषदेने उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग याबाबत दुरूस्ती असल्यास ती दुरूस्ती करण्यासाठी आणि माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याची सुविधा ‘https://mahatet.in’ या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगिंनमध्ये दिली आहे. नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदलासाठी जात प्रमाणपत्र, माजी सैनिक आरक्षणाकरिता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी किंवा ई-मेलद्वारे निवेदन दिले असल्यास उमेदवारांनी पुनश्च: आपल्या लॉगिनमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, दिलेल्या मुदतीनंतर तसेच अन्य प्रकारे आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT