education news Unique journey of Sambhaji Waghmare from Peon to Deputy Registrar sakal
एज्युकेशन जॉब्स

विद्यापीठातील शिपाई ते उपकुलसचिव संभाजी वाघमारे यांचा अनोखा प्रवास !

नोकरीच्या शोधात फिरत असताना तत्कालीन पुणे विद्यापीठात पोचले आणि शिपाई म्हणून नोकरी लागली

मीनाक्षी गुरव

पुणे : घरातील हलाखीच्या परिस्थिती मार्ग काढण्यासाठी जवळपास ४० वर्षांपूर्वी पुण्यात आलेले संभाजी. सुरवातीला नोकरीच्या शोधात फिरत असताना तत्कालीन पुणे विद्यापीठात पोचले आणि शिपाई म्हणून नोकरी लागली. परंतु ‘आयुष्यभर शिपाई म्हणून राहायचे नाही’ असं मनाशी पक्की ठरविलेल्या त्यांनी पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर बढत्या मिळत गेल्या आणि आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे संभाजी वाघमारे आता उपकुलसचिव म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.

बारामतीमधील कांबळेश्वर गावातील मुळचे असणारे वाघमारे पुण्यात राहत आहेत. घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी साधारणत: ३९ वर्षांपूर्वी पुणे गाठले. सुरवातीला मित्र, नातेवाईक यांचे सहकार्य घेत त्यांनी बाणेर भागात भाड्याने राहण्यास सुरवात केली. त्यानंतर ६ डिसेंबर १९८३ मध्ये ते विद्यापीठात शिपाई म्हणून रुजू झाले. त्यावेळी दहावी नापास असे त्याचे शिक्षण होते. तब्बल नऊ वर्ष शिपाई म्हणून नोकरी केली. दरम्यान, विद्यापीठात क्लार्क म्हणून काम करणाऱ्या विमल यांच्याशी वाघमारे यांचे रेशीमबंध जुळले आणि त्यांनी एप्रिल १९८६ मध्ये लग्न केले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून वाघमारे यांनी प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत पुढील शिक्षणास सुरवात केली आणि त्यांचा शिक्षणाचा हा प्रवास मुक्त विद्यापीठातून कला शाखेतील पदवी शिक्षणापर्यंत येऊन पोचला. पदवी शिक्षणानंतर त्यांची कामामध्ये पदोन्नती मिळत गेली. शिपाई, ज्युनिअर क्लार्क, सिनिअर क्लार्क, सहाय्यक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी, सहाय्यक कुलसचिव अशा पदांवर त्यांनी काम केले.

गेली सहा वर्ष ते विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. सेवानिवृत्ती जवळ आली असतानाच मार्चमध्ये त्यांच्याकडे उपकुलसचिव (वसतिगृहे) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. वाघमारे यांची दुसरी ओळख म्हणजे ते अभिनेता अक्षय वाघमारे यांचे वडील आहेत. आता मे महिन्याच्या अखेरीस वाघमारे हे उपकुलसचिव पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. विद्यापीठातील शिपाई ते उपकुलसचिव पदाचा सेवेतील प्रवासाबाबत वाघमारे यांनी अतोनात समाधान व्यक्त केले.

‘‘विद्यापीठात शिपाई म्हणून लागलो, परंतु अंगावरील शिपायाचा गणवेश काढायचा म्हणून अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदोन्नती मिळत गेली आणि आता उपकुलसचिव पदाचा (वसतिगृहे) अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे. या सगळ्या प्रवासात कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह अनेकांनी खूप साथ दिली. विद्यापीठात वेगवेगळ्या पदांवरून तब्बल ३९ वर्षे सेवा करता आली, यात समाधान आहे.’’

- संभाजी वाघमारे, उपकुलसचिव (वसतिगृहे- अतिरिक्त कार्यभार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala New Government Rules : पान मसाला कंपन्यांसाठी सरकारने जारी केले नवे निर्देश; जाणून घ्या, नवा नियम काय असणार?

Pune News : फसवणूक केलेले १४ कोटी महिनाभरात परत करू; आरोपींचे न्यायालयात हमीपत्र सादर; संगणक अभियंत्यासह पत्नीची फसवणूक प्रकरण!

Latest Marathi News Live Update : कांदिवली एएनसीकडून मोठी कारवाई करत ५० लाख रुपये किमतीचे ड्रग्स जप्त

चाहत्यांच्या गळ्यातलं ताइत, खलनायकांची खलनायिका पुन्हा परत येतेय; कोण आहे ती अभिनेत्री? तुम्ही ओळखलंत का?

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सायन उड्डाणपूल खुला होणार; पण कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT