education Scheme for Graduate and Post Graduate Apply today for Central Government Scholarships  sakal
एज्युकेशन जॉब्स

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाकरिता केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी करा आजच अर्ज

३१ ऑगस्टपर्यंत मुदत; पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरिता योजना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत (१२ वी) तुम्ही सर्वाधिक गुण प्राप्त केले असतील आणि पदवी अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला असेल. तर तुम्ही केंद्र सरकारच्या सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहात. राज्यातील पहिल्या सात हजार ४१७ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, ३१ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

उच्च शिक्षण संचालकांनी या संबंधीचे पत्रक निर्गमित केले असून, सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे. विद्यार्थ्यांनीही योजनेची माहिती घेत नवीन मंजुरी किंवा नूतनीकरणासाठीही अर्ज करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू असून, पदविका (डिप्लोमा) किंवा पदव्युत्तर पदविकेच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. गुणानुक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

पात्रता व अटी

- अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा किंवा स्टायपेंडचा लाभार्थी नसावा

- पालकांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाखापेक्षा जास्त नसावे

- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षापर्यंत आणि इतर अभ्यासक्रमांना पाच वर्षांपर्यंत देय राहील

अर्ज कसा करावा

- अधिकृत संकेतस्थळावर पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावा

- अर्जाच्या प्रती आवश्यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयांत जमा करावा

- महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शिक्षण संचालनालय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावा

संकेतस्थळ - https://scholarships.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT