Educational Policy and Indian Culture sakal
एज्युकेशन जॉब्स

शैक्षणिक धोरण व भारतीय संस्कृती

आपण इतिहास शिकतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्य घडवू शकतो, असे अनेकदा म्हटले जाते. इतरांच्या तुलनेत भारतीय नागरिक याबाबतीत अधिक सुदैवी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. प्रीती जोशी

आपण इतिहास शिकतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्य घडवू शकतो, असे अनेकदा म्हटले जाते. इतरांच्या तुलनेत भारतीय नागरिक याबाबतीत अधिक सुदैवी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरील एक प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते.

आता आपली हीच संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, त्यांना आपल्या समृद्ध भूतकाळाची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Systems - IKS) या विषयाचा नवीन शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) यात समावेश करून हा विषय विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य सरकारनेदेखील याबाबची अधिसूचना एप्रिल २०२२ मध्ये काढली.

भारताच्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि वैज्ञानिक वारशाचा अनमोल ठेवा विद्यार्थ्यांसमोर यावा हा यामागील प्रामाणिक उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दृष्टिकोन व्यापक होऊन त्यांना भारतीय पारंपरिक ज्ञानाची महत्त्व कळेल व ते यातून नक्कीच प्रेरणा घेतील.

अभ्यासक्रमाची गरज

हा अभ्यासक्रम अनिवार्य करणे का गरजेचे आहे याचा विचार केल्यास अनेक गोष्टी सांगता येतील. ‘आयकेएस’च्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या गाभ्याची ओळख होईल. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभिमान जागृत होईल, शिवाय भारतीय तत्त्वज्ञान,

आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, वास्तुकला, कला, संगीत अशा विविध क्षेत्रांतील प्राचीन ज्ञान व संशोधन या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना हस्तांतरित करता येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत व्यापकता येण्यास मदत होईल. ज्ञानाच्या भिन्न शालेय शाखा एकत्रित करून एक सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली निर्माण करण्यास याची मदत होणार आहे.

या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नैतिकता, मानवता आणि मूल्यशिक्षण रुजवण्याचे काम करता येईल. भारतीय तत्त्वज्ञानात सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे, ज्यामुळे विद्यार्थी केवळ बौद्धिकदृष्ट्या नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही सक्षम होतील.

प्रशिक्षणाची आवश्‍यकता

या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करीत असताना प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता हा महत्त्वाचा मुद्दा असून, शिक्षकांचे प्रशिक्षण करणे हे मोठे काम आहे. हेच लक्षात घेत सरकारने यासाठी अनेक केंद्रे सुरू केली असून, याद्वारे भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित संस्था, संशोधक हे याअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे काम करणार आहेत.

‘आयकेएस’मध्ये समाविष्ट केलेले विषय आणि त्यांचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार सुलभ असणे हा मुद्दादेखील महत्त्वाचा असून, यासाठी अद्ययावत पुस्तके, अभ्यासक्रम आणि डिजिटल साधनांचा वापर केला जाऊ शकतो.

भारतीय ज्ञानपरंपरेचे संशोधन करणाऱ्या संस्थांचा सहभाग या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाचा ठरणार असून, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (BORI) सारख्या संस्थांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन संशोधनपर माहिती आणि शास्त्रशुद्ध दृष्टिकोन प्राप्त करता येणे व सदर अभ्यासक्रम राबविणे शक्य आहे. त्याचप्रमाणे ‘आयकेएस’विषयी सखोल माहिती असलेल्या तज्ज्ञांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाऊ शकते. यातून विद्यार्थ्यांना प्राचीन ज्ञानाची समृद्धी थेट जाणून घेण्याची संधी मिळेल.

व्यक्तिमत्त्व विकास

नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञानपरंपरा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. अशा पद्धतीने जेव्हा तो औपचारिकरीत्या शिकविला जाईल त्या वेळेस विद्यार्थ्यांना आपल्या प्राचीन वारशाची ओळख होईलच, याशिवाय याची सांगड आधुनिक ज्ञानाशी घालून ते आपले व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करू शकतील.

(लेखिका भारतीय विद्येच्या अभ्यासक आहेत व श्री बालाजी विद्यापीठ, पुणे स्कूल ऑफ लिबरल आर्टसच्या प्राचार्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT