Merit List sakal
एज्युकेशन जॉब्स

Eleventh Admission : अकरावी प्रवेशाची पहिली अंतिम गुणवत्ता यादी १९ जून रोजी होणार जाहीर

अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रमासह अर्जाचा भाग दोन भरण्याची सुविधा येत्या गुरुवारपासून (ता.८) सुरू होणार आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रमासह अर्जाचा भाग दोन भरण्याची सुविधा येत्या गुरुवारपासून (ता.८) सुरू होणार आहे. यावर्षीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आणि कट-ऑफ १९ जून रोजी जाहीर होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहेत.

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा असते ती अकरावी प्रवेशाची. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येते. या अंतर्गत प्रवेशाची पहिली नियमित फेरी जाहीर केली आहे. शिक्षण संचालनालयाने कोटांतर्गत प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांची नोंदणीची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

*पहिली नियमित फेरी -

तपशील : कालावधी

- प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन सादर करणे, नवीन विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी भरणे : ८ ते १२ जून

- अर्जाचा भाग एक भरलेल्या आणि पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : १३ जून

- गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या तपशीलामध्ये काही दुरुस्त्या व हरकती नोंदविणे, दुरुस्तीबाबत हरकतींचे ऑनलाइन निराकरण करणे : १३ ते १५ जूनपर्यंत

- पहिल्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविणे, महाविद्यालयांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी दर्शविणे, फेरीचा कट ऑफ जाहीर करणे : १९ जून (सकाळी १० वाजता)

- पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत, प्रवेश निश्चित करणे, प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीची वाट पाहणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे : १९ ते २२ जून

- प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना वेळ : २२ जून

- दुसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : २३ जून

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना -

- मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करावे

- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी

- संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा

- प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीत सहभागी होता येईल

- प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे अनिवार्य

- प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल

- निश्चित केलेला प्रवेश रद्द करण्यासाठी संबंधित महाविद्यालयात विनंती करून प्रवेश रद्द करावा.

- निश्चित केलेला प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील एक फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.

प्रवेशाच्या पुढील फेऱ्यांचे संभाव्य वेळापत्रक -

  • दुसरी नियमित प्रवेश फेरी : २६ ते ३० जून

  • तिसरी नियमित प्रवेश फेरी : १ ते ९ जुलै

  • विशेष प्रवेश फेरी : १० ते १८ जुलै

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT